जिल्ह्यात आता पर्यंत ७०९ रुग्णांचा कोरोना बळी घेतला आहे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आज जिल्ह्यात १०६२ नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे आज ४४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे काही प्रमाणात जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्यामूळे येथील चिंता वाढली आहे. रोजच संख्या वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस येथील परिस्थिती नाजूक होत चालली आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ७०९ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. तर जिल्ह्यात आता पर्यंत ३२,३४० रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सर्वांनी खबरदारी घेत ही लढाई जिंकण्याची गरज निर्माण झाली आहे.