प्रभाग क्र.७ मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर
गेवराई प्रतिनिधी ः- सत्ता असो वा नसो माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांनी मतदार संघातील जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभाग घेतला आहे. जनतेच्या संकट काळात त्यांना वाऱ्यावर न सोडता धिर देण्याचे काम शिवछत्र परिवाराने केलेले आहे. भैय्यासाहेबांचे मार्गदर्शन आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई शहरामध्ये विकासात्मक दृष्टीने काम करायचे आहे. त्यामुळे संकटकाळी मदतीचा हात देणाऱ्या शिवछत्र परिवाराल साथ देऊन मतदानरुपी आशिर्वाद द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांनी केले. प्रभाग क्र.७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ.पुजा सुतार व मनोज धापसे यांच्यासह मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
गेवराई नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रभागनिहाय शहरभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. प्रभाग क्र.७ मधील संघमित्रनगर, साठेनगर, मोंढा नाका, सिंधी कॉलनी, महेश कॉलनी या भागात उमेदवार सौ.शितलताई दाभाडे, सौ.पुजा सुतार व मनोज धापसे यांनी प्रचार फेरी काढली. यावेळी बोलताना सौ.शितलताई दाभाडे पुढे म्हणाल्या की, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेच्या सुख-दुःखात सदैव साथ दिली आहे. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये विरोधक घरात झोपलेले असताना आपल्या जिवाची परवा न करता अमरसिंह पंडित यांनी लोकात जावून त्यांना धिर दिला. शारदा प्रतिष्ठानच्यावतीने त्यांनी कोविड सेंटर सुरु केले. उपजिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर भेट देऊन सामाजिक दायित्व उचलले लॉकडाऊनच्या काळात गरीब व होतकरू लोकांना मोफत किराणा वाटप केला. असे सामाजिक भान असणाऱ्या शिवछत्र परिवाराला बळ देण्याची आता वेळ आलेली आहे. उद्याच्या २ तारखेला घड्याळ चिन्हाला मतदान करून माझ्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह प्रभाग क्र.७ मधील उमेदवार सौ.पुजा सुतार व मनोज धापसे यांनी मतदारांशी संवाद साधला.
![]()















