बीड प्रतिनिधी : शहराचे राजकारण अनेक वर्षे डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाभोवती फिरत आले आहे. शहरातील विकासकामांसह ३५ वर्षांची सेवा त्यांनी बजावली. आता बदलत्या जनतेच्या अपेक्षा ओळखत शहरातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योतीताई घुंबरे यांनी दिली.
बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर रोड परिसरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत डॉ.ज्योतीताई घुंबरे आणि डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर डॉ. घुंबरे वेगवेगळ्या भागात फिरत जनसंपर्क करत आहेत. उच्चशिक्षित उमेदवार म्हणून त्यांना व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. “बीड शहरातील विविध समस्या लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करू,” असे मत व्यक्त करताना डॉ. घुंबरे यांनी म्हटले की, घराणेशाही नसलेली, पहिल्यांदा निवडणूक लढविणारी उमेदवार म्हणून जनतेचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी बोलताना डॉ. सारिका क्षीरसागर म्हणाल्या, “बीड शहरासाठी आपल्या सर्वांचा हक्काचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभा केला आहे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी प्रत्येकाने आपला ठाम पाठिंबा द्यावा.” या बैठकीस भाजप नेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, चंद्रकांत फड, राजाभाऊ गुजर, साहस आदोडे, अंबादास गुजर, डॉ.रमेश शिंदे, शालिनी परदेशी, समर्थ तांदळे, महेश गुजर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.















