परळी वैजनाथ प्रतिनिधी : परळी नगरपालिका निवडणुकीतील भाजपाचे सर्व उमेदवार आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधी स्थळे नतमस्तक झाले. सर्वांनी राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व मा. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी विजयी सर्वांना विजयी करण्याचे साहेबांना साकडे घातले.
परळी वैजनाथ नगरपालिका निवडणुका आता रंगात येऊ लागल्या आहेत. काही उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपाचे सर्व उमेदवार आज गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. आपला वसा आणि वारसा चालवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ना. पंकजाताई मुंडे व मा. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या असे साकडे सर्वांनी साहेबांच्या समाधी स्थळे घातले.
यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टी, युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, उमेदवार प्रा. पवन मुंडे, डॉ. पूजा तोतला, सौ. जयश्री शंकरआप्पा मोगरकर, सौ. वंदना अश्विन आघाव, सौ. अंजली माळी, शांताबाई नाईकवाडे, सौ. उषा किशोर केंद्रे, योगेश मेनकुदळे, सौ. सारिका हरंगुळे आदी उपस्थित होते.

















