परळी वैजनाथ : भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरलेल्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी आज गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
नगरपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. जिल्ह्यातील सहा पैकी पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर परळीत महायुतीचा उमेदवार आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डाॅ ज्योती घुंबरे (बीड), नंदकिशोर मुंदडा (अंबाजोगाई), गीता भाभी पवार (गेवराई), रामचंद्र निर्मळ (धारूर), संध्या मेंडके (माजलगांव) यांनी सायंकाळी गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांचे सर्व उमेदवारांनी निवडणूकीत संधी दिल्याबद्दल आभार मानले. ना. पंकजाताईंनी देखील सर्वांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नगरपरिषद निवडणूकीत सर्व जागांवर संपूर्ण ताकदीनिशी विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार याप्रसंगी उमेदवारांनी केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, माधव निर्मळ, रूपाली कचरे, विनायक रत्नपारखी, ज्ञानेश्वर मेंडके आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.