गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र घालून राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे गेवराई तालुक्यात कार्यकर्त्यांकडून पुन्हा फटाके वाजून दिवाळी साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे मुस्लिम समाज बांधवांनी गेवराई शहरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करून या प्रवेशाला पाठिंबा दिला आहे.
दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी परळी येथे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आयोजित केलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात गेवराई विधानसभा मतदारसंघातील लोकनेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. नामदार पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे गळ्यात भाजपचा रुमाल आणि पुष्पहार घालून स्वागत केले. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केल्याने हा बीड जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का समजला जात आहे. गोरगरिबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने झगडणारे नेते म्हणून बदामराव पंडित यांची राज्यभरात ओळख आहे. तीन वेळेस आमदार आणि शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम केलेले माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविलेले बदामराव पंडित हे 73 हजार मते घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिले होते. राज्याचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस ना पंकजाताई मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट आणि चर्चा नंतर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी परळी येथे ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी युवा नेते बाळराजे पवार, यांच्यासह युवा नेते रोहित पंडित, बजरंग सानप, सुनील ढाकणे, नारायण गाडे, बाळासाहेब नागटिळक, बाळासाहेब राऊत, राजेश करांडे, उज्वल सुतार आदींसह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बदामराव पंडित यांच्या प्रवेशामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला मोठी ताकद मिळणार आहे. नुकत्याच होऊ घातलेल्या नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बदामराव पंडित यांच्या भाजपा प्रवेशाने गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी अडचण होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. कारण बदामराव पंडित आणि बाळराजे पवार हे दोघेही भाजपमध्ये एकत्रित आल्याने खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करावे आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांची कामे करून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवावी असे आवाहन यावेळी पंकजाताई मुंडे यांनी दोघांनाही केले आहे. बदामराव पंडित यांचा भाजपात प्रवेश झाल्याचे समजताच गेवराई तालुक्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे गेवराई शहरात मुस्लिम समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत बदामराव च्या प्रवेशाला पाठिंबा दिल्याचे दिसले.
मुस्लिम बांधवांनी वाजवले फटाके