बीड दौऱ्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची महत्वपूर्ण बैठक; स्थानिक प्रश्नांना दिली दिशा
बीड, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात सध्या महायुतीचे सरकार प्रस्थापित झालेले असून महायुतीने सर्वसामान्य जनतेसाठी विविध हितदायी योजनांची उभारणी केलेली आहे. मात्र अजूनही तळागाळातील लोकांना या योजनांची सखोल माहिती पोहोचलेली नाही तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपण महायुतीच्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारीला लागावे याबरोबरच बीड जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालण्यासाठी महिला आघाडीने देखील स्वतःहून पुढाकार घ्यावा. तसेच महिला आघाडीचे संघटन आणखीन बळकट करावे व महिला आघाडीने महिलांच्या सबळीकरणासाठी महायुती सरकारने उभारलेल्या योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्याकरिता प्राधान्याने पुढाकार घ्यावा असे विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी बीड जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
काल दि. २२ एप्रिल २०२५ रोजी बीड शासकीय विश्रामगृह येथे सकाळी १०. ०० वाजता विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम ताई गोऱ्हे दाखल झाल्या. त्यांनी शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर आणि महिला आयोग सदस्य तथा शिवसेना मराठवाडा महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीता चव्हाण यांना सोबती घेऊन बीड जिल्ह्याच्या प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. या बैठकीत त्यांनी विविध स्थानिक समस्यांचा आढावा घेतला आणि आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही दिल्या. डॉ. गोऱ्हे यांची ही दौरा केवळ भेट न राहता, जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी निर्णय घेण्यासाठीचा एक सकारात्मक पाऊल होते. दरम्यान डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना बीड जिल्ह्याची वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांची यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करत मुक्त संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख
स्वप्निल गलधर आणि महिला आयोग सदस्य तथा मराठवाडा महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीता चव्हाण यांच्यासह बीड जिल्हा शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शेतकरी सेना, ओबीसी सेना, अनुसूचित जाती-जमाती सेना, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित उपस्थित होते.
—–
*चौकट!*
*स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा- अशोक पटवर्धन*
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. राज्यात शिवसेनेला मिळालेल्या अफाट यशानंतर बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनो पूर्ण ताकदीने कामाला लागा. शिवसेना सदस्य नोंदणीचे फॉर्म जास्त संख्येने भरून शिवसेना पक्ष संघटन मजबूत करा असे शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
°°°°°