सर्व मराठा सेवक ग्रामीण भागातील मतदारांच्या घेणार भेटी
बीड, प्रतिनिधी- अठरा पगड जाती धर्मातील बीड विधानसभा लोकप्रिय अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने पाठिंबा दिल्यानंतर अवघ्या टीमने मिळून आज सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले व त्यानंतर शेकडो गाडयांचा ताफा घेऊन महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गड येथे श्री नगद नारायणा चरणी नतमस्तक होऊन अनिलदादा जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फोडला व प्रचाराचा शुभारंभ केला. याप्रसंगी सर्वांनी मिळून नारायण गड येथे हभप गुरुवर्य शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. आज सर्व मराठा सेवक आपली वेगवेगळी टीम करून ग्रामीण भागातील मतदारांच्या घेणार भेटी घेणार असून बीड विधानसभा अपक्ष उमेदवार यांना बीड मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता विक्रमी मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन मतदारांना करणार असल्याचे माध्यमांना सांगितले. याप्रसंगी सर्व मराठा समन्वयक तथा सकल मराठा सेवक उपस्थित होते.
सन्मानीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितले होते की, जो उमेदवार समाजासाठी कार्य करत आला आहे, जो मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपलं योगदान देतोय व जो समाजाच्या फायद्याचा आहे त्याला निवडणून आणा. तुम्ही सर्वानुमते ठरवा आणि मला सांगा असे मनोजदादांना आम्हाला सांगितले होते. त्यानंतर आम्ही वीस जणांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपलं योगदान देणारे आणि सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारे बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे व आज आम्ही सर्वांनी छत्रपती शिवारायांना वंदन करून श्री नगद नारायणा चरणी नतमस्तक होऊन बीड मतदार संघात प्रचाराला सुरुवात केली आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना अनुक्रमांक 13 वरील चिन्ह शिवण यंत्र यावर बटन दाबून विक्रमी मतांना निवडून आणावे असे आवाहन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सर्व समर्थकांनी मिळून बीड मतदार संघातील मतदारांना केले आहे.
°°°°°