पालकमंत्री अतुल सावे उद्या बीड जिल्हा दौरावर
बीड : राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ...
Read moreबीड : राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ...
Read moreनेकनूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान...! बीड प्रतिनिधी काल रात्री नेकनूर पोलिसांनी येळंबघाट येथील उड्डाण पुलाजवळ सापळा रचून KA 51 – AD 9009 हा संशयित कंटेनर अडवून तपासणी केली. या कंटेनर मध्ये चौतीस लाख दहा हजार किमतीची 35 देशी गाय व बैल आढळून आले. चौकशी अंती हि जनावरे तामिळनाडू राज्यातील सेलम येथे कत्तल करण्यासाठी जाणार आहेत. असे निदर्शानास आल्या नंतर पोलिसांनी कंटेनर सह जनावरे ताब्यात घेतली. या गाय बैलांना बीड येथील तुकाराम गुरुजी गोशाळेत आश्रय देण्यात आला. नेकनूर परिसरातील जैताळवाडी शिवारातून जनावराचे व्यापारी मुस्तकिम कुरेशी यांनी ही जनावरे केरळच्या व्यापाऱ्यास विकली होती. दोन देशी गायी व तेहतीस खिल्लार बैल असे पसतीस जनावरे LAYLAND कंपनीच्या कंटेनर क्र. KA 51 – AD 9009 मध्ये जनावरांचे पाय एकमेकांना बांधून कोंबून भरली होती. जनावानाची कोणतीही काळजी न घेता अमानुष पणे वाहतूक केली जात होती. वाहनचालक यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे आढळून आली नाहीत. सदरील जनावरे सेलम येथील कत्तलखाण्यात जात होती. नेकनूर पोलिसांनी वेळीच पाठलाग करून, सदरील कंटेनर ताब्यात घेऊन मध्यरात्री बीड येथील तुकाराम गुरुजी गोशाळेत दाखल केली आहेत. नेकनूर पोलिसांच्या या कारवाई मुळे जनतेमध्ये समाधान ...
Read moreबीड प्रतिनिधी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवात महिलांसाठी माता सुरक्षित तर घर ...
Read moreअमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत भाजपाचे शेकडो कार्यकर्ते दाखल गेवराई प्रतिनिधी : दीवाळीच्या धामधूमीत गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत प्रवेशाचे फटाके फुटत ...
Read moreराष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर रस्ताकामासही प्रत्यक्षात सुरूवात बीड प्रतिनिधी :- बीड शहरासह जिल्हाभराच्या दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या नगर रोडवरील खड्ड्यांमुळे ...
Read moreकेज प्रतिनिधी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार यांनी दिवाळी निमिताने केज शहरातील गोरगरीब, कष्टकरी दुर्बल घटकांतील नागरिकांना मिठाई ...
Read moreकेज प्रतिनिधी: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीत देखील बदल करण्यात आले आहेत. ...
Read moreचहाच्या गाड्यावर 15,000 हजाराचा गुटखा तर जिल्ह्यात किती? जिल्ह्यातील अन्न प्रशासन विभाग फक्त नावालाच; जिल्हाधिकारी साहेब थोडे लक्ष द्याच! प्रारंभ ...
Read moreप्रारंभ वृत्तसेवा बीड : माजीमंञी जयदत्त क्षीरसागर यांचा व शिवसेनेचा यापुढे कसलाही संबंध राहणार नसल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल ...
Read moreखा. प्रितमताईंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने भेट...! बीड प्रतिनिधी परतीच्या पावसाने गेली पंधरा दिवसापासून संपूर्ण जिल्हाभरात पाऊसाने थैमान मांडले आहे. शिरूर का., आष्टी, पाटोदा तालुक्यात झालेल्या ढगफुटीने तर कहरच केला. शेत पिकासह मनुष्यहानी पण झाली. ऑगस्ट महिन्यातील खंडित पावसामुळे खरीप पिके ताणली गेली. आणि सध्याच्या अतिवृष्टीमुळे पिकांना शेतात तरंगी लागली आहे. पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिन झाला असून, अतिवृष्टीचा फटका सहन करण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांच्या नशिबी आली. उस, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी आदि नगदी पैशाची पिके ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातची गेले आहेत. फळबागांना मोठा फटका बसला असून, उत्पन्नात घट होणार आहे. शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन, आज बीडच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी सकाळ पासूनच आष्टी, शिरूर का., पाटोदा तालुक्याचा दौरा करून, थेट बांधावर जाऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गाच्या अवकृपेत सापडलेला शेतकरी हतबल असून, अनेक शेतकऱ्यांना खा. ताई समोर कैफियत मांडताना उर भरून आला. ताई आता तुम्ही काहीतरी करा असा टाहो फोडत महिला ताईंच्या गळ्यात पडून आपल्या वेदना आणि भावना व्यक्त केल्या. सर्वत्र भयाण परिस्थिती असून, शेती व शेतपिकांचे झालेले नुकसान तर कर्ज आणि उसनवारी करून केलेली लागवड, शेतात उपसलेले काबाड कष्ट लक्षात घेता पिकांचे झालेले नुकसान या सर्व बाबींचा विचार करता आज शेतकरी बांधव हताश व निराश होऊन शून्यात विचार करतो आहे. या दारूण परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ शकतो. गेली आठ दिवसात जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद आहे. या बिकट परस्थितीचा विचार करून, आज खा. प्रितमताई यांनी तातडीने जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची जिल्हा कचेरीच्या दारातच भेट घेऊन, अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा सांगितला. परिस्थिती गंभीर असून, पंचनाम्यासाठी कागदी घोडे नाचवण्यात वेळ न दवडता विना पंचनामा सरसकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, सर्जेराव तात्या तांदळे , किरण आबा बांगर, नवनाथ शिराळे, शांतीनाथ डोरले, बालाजी पवार, कृष्णा तिडके, कपिल सौदा, संभाजी सुर्वे, संतोष राख, बद्रीनाथ जटाल, महेश सावंत, अभिजित तांदळे सर, सुरेश माने आदी उपस्थित होते.
Read morePrarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.
Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.