ताज्या बातम्या

बेताल वक्तव्य करणार्‍या खा.अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे बीड मध्ये दहन

सावंत यांच्यासह ठाकरे गटाने चुकीचे भाष्य करु नये- कुंडलिक खांडे बीड प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल...

Read more

छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक रवाना होणार -जिल्हाप्रमुख अनिल जगताप

बीड प्रतिनिधी :  आज छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या महाविकास आघाडीच्या विराट सभेला बीड जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक रवाना होणार आहेत....

Read more

नारायण गडाच्या निधीसाठी शिंदे-फडणवीस सरकार कमी पडणार नाही; मंत्री संदीपान भुमरे नारायण गडावर नतमस्तक!

केतुरा गावच्या रुंदीकरणाला मंत्री भुमरे यांची रोख 51 हजारांची मदत बीड(प्रतिनिधी) मला फार आनंद झाला तुम्ही जे काम करताय त्या...

Read more

कामाची वेळ संपून सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सह्या सुरुच!

31 मार्च असल्यामुळे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी तळ ठोकून प्रारंभ वृत्तसेवा बीड : आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपत...

Read more

गेवराई राष्ट्रवादीत प्रवेशाचे फटाके फुटू लागले

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत भाजपाचे शेकडो कार्यकर्ते दाखल गेवराई प्रतिनिधी : दीवाळीच्या धामधूमीत गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत प्रवेशाचे फटाके फुटत...

Read more

नागरिकांना होणारा त्रास असह्य झाल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी केली नगर रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरूवात

राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर रस्ताकामासही प्रत्यक्षात सुरूवात बीड प्रतिनिधी :- बीड शहरासह जिल्हाभराच्या दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या नगर रोडवरील खड्ड्यांमुळे...

Read more

खा. रजनीताई पाटील यांची काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या सदस्यपदी नियुक्ती !

केज प्रतिनिधी:  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीत देखील बदल करण्यात आले आहेत....

Read more

डॉ. साबळेंना गुटखा सापडतो मग अन्न प्रशासन अधिकाऱ्यांना का नाही?

चहाच्या गाड्यावर 15,000 हजाराचा गुटखा तर जिल्ह्यात किती? जिल्ह्यातील अन्न प्रशासन विभाग फक्त नावालाच; जिल्हाधिकारी साहेब थोडे लक्ष द्याच! प्रारंभ...

Read more

जयदत्त क्षीरसागरांचा व शिवसेनेचा यापुढे संबंध राहणार नाही — अनिल जगताप

प्रारंभ वृत्तसेवा बीड : माजीमंञी जयदत्त क्षीरसागर यांचा व शिवसेनेचा यापुढे कसलाही संबंध राहणार नसल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल...

Read more

पंचनामे न करता सरसकट  शेतकऱ्यांना मदत द्या..!

खा. प्रितमताईंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने भेट...!   बीड प्रतिनिधी परतीच्या पावसाने गेली पंधरा दिवसापासून संपूर्ण जिल्हाभरात पाऊसाने थैमान मांडले आहे. शिरूर का., आष्टी, पाटोदा  तालुक्यात झालेल्या ढगफुटीने तर कहरच केला. शेत पिकासह मनुष्यहानी पण झाली. ऑगस्ट महिन्यातील खंडित पावसामुळे खरीप पिके ताणली गेली. आणि सध्याच्या अतिवृष्टीमुळे पिकांना शेतात तरंगी लागली आहे. पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिन झाला असून, अतिवृष्टीचा फटका सहन करण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांच्या नशिबी आली. उस, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी आदि नगदी पैशाची पिके ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातची गेले आहेत. फळबागांना मोठा फटका बसला असून, उत्पन्नात घट होणार आहे.  शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन, आज बीडच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी सकाळ पासूनच आष्टी, शिरूर का., पाटोदा तालुक्याचा दौरा करून, थेट बांधावर जाऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गाच्या अवकृपेत सापडलेला शेतकरी हतबल असून, अनेक शेतकऱ्यांना खा. ताई समोर कैफियत मांडताना उर भरून आला. ताई आता तुम्ही काहीतरी करा असा टाहो फोडत महिला ताईंच्या गळ्यात पडून आपल्या वेदना आणि भावना व्यक्त केल्या. सर्वत्र भयाण परिस्थिती असून, शेती व शेतपिकांचे झालेले नुकसान तर कर्ज आणि उसनवारी करून केलेली लागवड, शेतात उपसलेले काबाड कष्ट लक्षात घेता पिकांचे झालेले नुकसान या सर्व बाबींचा विचार करता आज शेतकरी बांधव हताश व निराश होऊन शून्यात विचार करतो आहे. या दारूण परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ शकतो. गेली आठ दिवसात जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद आहे. या बिकट परस्थितीचा विचार करून, आज खा. प्रितमताई यांनी तातडीने जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची जिल्हा कचेरीच्या दारातच भेट घेऊन, अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा सांगितला. परिस्थिती गंभीर असून, पंचनाम्यासाठी कागदी घोडे नाचवण्यात वेळ न दवडता विना पंचनामा सरसकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, सर्जेराव तात्या तांदळे , किरण आबा बांगर, नवनाथ शिराळे, शांतीनाथ डोरले, बालाजी पवार, कृष्णा तिडके, कपिल सौदा, संभाजी सुर्वे, संतोष राख, बद्रीनाथ जटाल, महेश सावंत, अभिजित तांदळे सर, सुरेश माने आदी उपस्थित होते.

Read more
Page 75 of 79 1 74 75 76 79

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.