बीड- बीड विधानसभा मतदारसंघ निवडणुकाची रणधुमाळी सुरू असताना दिवसेदिवस ज्योतीताई मेटे यांना चांगला प्रतिसाद मिळत असताना दिसून येते आहे, आज शिरूर तालुक्यातील औरंगपूर आर्वी जांब शिरापूर गात , पोंडुळ 1,2,3, कमळेश्वर धानोरा लिंबा , खांबा, खलापुरी या बीड मतदार संघातील गावात जन आशीर्वाद दौरा झाला या वेळी, बीड मतदार संघातील विकास उजेडात आणण्यासाठी ज्योतीताईंच्या बॅटरीला निवडून आणण्यासाठी मतदार सरसावले असल्याचे दिसून येत आहे या वेळी महिलांची मोठी उपस्थीती होती.
बीड मतदार संघात डॉ. ज्योती मेटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदार संघातील गावोगावी त्यांनी जन आशीर्वाद प्रचार दौरे सुरू केले आहेत. या प्रचार दौऱ्यात त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून डॉ. मेटे यांचे गावोगावी जंगी स्वागत होत आहे. एक उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ अधिकारी बीडचा आमदार झाला तर आनंदच होईल अशी भावना यावेळी मतदार व्यक्त करत आहेत. या प्रचारादरम्यान डॉ. ज्योती मेटे यांचे गावोगावी जंगी स्वागत होत आहे. या स्वागतासाठी महिलांचे देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती पहावयास मिळत आहे.

















