गेवराई – विजयसिंह पंडित यांना आमदार करून गेवराई विधानसभा मतदार संघाचे मागच्या दशकात झालेले नुकसान यंदा भरून काढू मतदार संघाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना विजयासाठी बळ देऊ असे प्रतिपादन पिंपळनेर सर्कलमधील युवा नेते संजय (बप्पा) नरवडे यांनी केले. पिंपळनेर येथील बदामराव पंडित समर्थक संजय (बप्पा) नरवडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी पिंपळनेर येथील जय भवानी कारखान्याचे संचालक सुनिल पाटील, अमर शेख, पं.स.सदस्य किशोर सुरवसे, राम जाधव, शेख अखिल, सरपंच महेश शिंदे, प्रताप माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पिंपळनेर सर्कलमधील बदामराव पंडित समर्थक संजय (बप्पा) नरवडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी बोलताना संजय नरवडे म्हणाले की, मतदार संघाचा विकास कसा करायचा असतो हे शिवछत्र परिवाराकडे पाहून शिकावे. सत्ता नसतानाही माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी विविध योजनांच्या माध्यमातून गेवराई मतदार संघात खेचून आणला, जलसिंचनाची कामे उभारली, सर्वसामान्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवले, गोरगरीबांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्न सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून मार्गी लावला, आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली, कोविड संक्रमणाच्या कठीण काळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना धीर दिला. विरोधक मात्र घरातच बसले. विरोधकांच्या हातात तालुक्याचे प्रतिनिधीत्व गेल्यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघाचे नुकसान झाले ते नुकसान भरुन काढण्यासाठी विजयसिंह पंडित यांना आमदार करणे गरजेचे आहे. त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने काम करू व पिंपळनेर सर्कलमधून सर्वाधिक मताधिक्य विजयसिंह पंडित यांना मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संजयबप्पा नरवडे यांच्यासह गंगाधर नरवडे, सखाराम नरवडे, प्रकाश नरवडे, मच्छिंद्र खाडे, पवन काटे, अक्षय जाधव, बारीक साळूंके, अनिल आरे, सचिन पारवे, मोहन आरे, शेख फारुक, शेख चाँद, रुस्तूम शेख, शेख जलील, शेख ताहेर, शेख राजू, बाळासाहेब भोसले, सुनिल ठोकरे, महेश पवार, आकाश चादर, शेख सलामत, चंदू गायकवाड, तात्या नरवडे, असलम कुरेशी, शेख महेमुद यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करून विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.
*मेन रोड गेवराई येथील असंख्य कार्यकर्ते*
*अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये दाखल*
==============
महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ गेवराई शहरातील मेन रोड येथे झालेल्या एका कॉर्नर बैठकीत अमरसिंह पंडित उपस्थितीत बदामराव पंडितांचे असंख्य समर्थक राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणुक दिली जाईल, तुम्ही टाकलेला विश्वास सार्थ केला जाईल. विधानसभा मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, तुमची प्रत्येक अडचण, समस्या सोडविण्यासाठी शिवछत्र परिवार कायम तुमच्या सोबत आहे. विजयसिंह पंडित यांना विजयी करून एकवेळेस काम करण्याची संधी त्यांना द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी शेषेराव मोटे, दिगांबर मोटे, दत्ता मोटे, शहादेव मोटे, शंकर मोटे, काशिनाथ मोटे, मारुती मोटे, गणेश मोटे, गोकुळ मोटे, परमेश्वर मोटे, दामोधर मोटे, शैलेश मोटे, कृष्णा मोटे, अर्जुन मोटे, सोमनाथ पवार, दिपक मोटे, शुभम मोटे, संकेत काळे, विशाल मोटे, शुभम कानगुडे, उमेश मोटे, आकाश मोटे, राजेश मोटे, नितीन मोटे आदींनी राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचलन मंगेश मोटे यांनी केले.