सुरेश धस यांचा सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने विधानभवनात निरोप समारंभ..
आष्टी प्रतिनिधी : भारत देशाचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जे.पी.नड्डा तसेच माजी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भा.ज.पा. राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या आशीर्वादामुळे धाराशिव तथा लातूर/बीड या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ कार्यक्षेत्राचा विधान परिषद सदस्य म्हूणन जबाबदारी मिळाली या माध्यमातून धाराशिव बीड आणि लातूर या तीनही जिल्हातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला सभागृहात आणि सभागृहाबाहेर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो असे मनोगत आ.सुरेश धस यांनी केले.
धाराशिव,लातूर,बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेचा सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने विधानभवनात निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की,वास्तविक पाहता या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला यापूर्वी कधीही यश प्राप्त झालेले नव्हते एक आव्हान म्हणून हे स्वीकारले आणि सर्व पक्षश्रेष्ठी मतदारसंघातील जवळच्या कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळे विजयश्री खेचून आणला.या माध्यमातून धाराशिव, बीड आणि लातूर या तीनही जिल्हातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला .अगदी कोविड-19 या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनतेवर मोठे संकट आले असतानाही कोणतेही कधीही शांत बसलो नाही. सभागृहात आणि सभागृहाबाहेर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या वेळोवेळी सूचना आणि आदेश प्रमाण मानून प्रधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, दूध उत्पादक शेतकरी यांच्यासह सर्वसामान्य जनतेचा विकास साधायचा प्रयत्न केला असे शेवटी धस म्हणाले.
बीड-धाराशिव आणि लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषद सदस्याचा आ.सुरेश धस यांचा कार्यकाळ नुकताच संपला.
विधान परिषदेत सभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी विधिमंडळात आयोजित केलेल्या विधानपरिषद सदस्यांच्या निरोप समारंभास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सुरेश धस यांना मी खरं म्हणजे मनापासून धन्यवाद देतो त्यांनी एखादा विषय घेतला तो धसाच लावायचा नावाप्रमाणेच..अशी त्यांच्या कामाची पद्धत असून एखादा ज्वलंत विषय जो असतो तो कसा मिटेल त्याला काय केलं पाहिजे त्याला कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा त्याच्या संबंधित मंत्र्यांनी केला पाहिजे याचा पाठपुरावा ते करतात हे मी जवळून पाहिला आहे. त्यांनी विधानपरिषद सभागृहात अतिशय चांगले काम केले असून यापुढेही ते करतील.धस यांनी केलेली अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली आहे.त्याचा उपमुख्यमंत्री नक्कीच विचार करतील .धस यांच्यासारख्या चांगले सदस्यांची सभागृहाला त्यांची आवश्यकता आहे. त्यांच्या वाचन आणि भाषण शैली देखील चांगली असून त्यांच्या सभागृहातील भाषणाचा नेहमी धसका लोक घेतात. सर्व विषयात रस त्यांचे नाव सुरेश धस.
एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री
नुसता अभ्यास नाही तर ते मांडण्याची जी आग्रही वृत्ती आहे ती आग्रही वृत्ती आमदार सुरेश धस यांच्यात असून हे सगळं करत असताना जमिनीशी जी नाळ आहे. अभ्यासू वृत्ती असून चालत नसून त्याला प्रॅक्टिकली असणं फार गरजेचे आहे ते आमदार सुरेश धस मध्ये पाहायला मिळतं आणि ते प्रॅक्टिकल नॉलेज आमदार सुरेश धस यांच्यात आहे. येणाऱ्या काळात आपल्या बाबत जो निर्णय घेयचा आहे तो आम्ही सर्व मिळून नक्कीच घेऊ
ना.देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री
सुरेश धस यांना देखील मी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. काही काळासाठी त्यांना राज्यमंत्री पदाची संधी देखील मी त्यांना दिली. त्यांनी विविध खात्याची मंत्री पदाची जबाबदारी अतिशय जबाबदारीने सांभाळली. राजकारणात अनेक वर्तुळे त्यांनी पार केली असून तरुणपणात सरपंचपदापासून त्यांनी अनेक पदे भूषवले.
अजित पवार
उपमुख्यमंत्री
सुरेश धस म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ …सगळ्या विषयांचा ज्ञान आणि ते पण सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत त्यांचा आहे धस यांची या सभागृहाला नक्कीच कमी जाणवेल..आमदार धस यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ची अपेक्षा व्यक्त केली आहे ते नक्कीच देवेंद्रजी ठरवतील मात्र या सभागृहात आमदार सुरेश धस हे असणे हे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.ते नक्कीच पुढच्या वेळेस या सभागृहात असतील आज मी मनमोकळेपणाने बोलतोय पक्षाच्या विचाराचा प्रोटोकॉल तोडून बोलतोय हे मला नक्कीच कळतेय मात्र त्यांची या सभागृहाला आवश्यकता आहे..
ना.अंबादास दानवे
विरोधी पक्षनेते