हिंदू स्मशानभूमीची चतु;सिमा बदलून खोटे दस्तावेज बनविल्याचे प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
बीड प्रतिनिधी : शहरातील हिंदु स्मशानभूमीच्या पूर्वेकडील जागेची चतु;सिमा बदलून तत्कािलन सीओ उत्कर्ष गुट्टे आिण ट्रेसर सय्यद सलीम यांनी खोटे दस्तावेज तयार केले. या दस्तावेजाच्या आधारे हिंदूंची स्मशनभूमीची जागा हडपण्याचा या दोघांचा प्रयत्न होता. मात्र या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 जून रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत तत्कालीन सी.ओ. गुट्टे आणी ट्रेसर सलीम यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा असे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सी.ओ. उत्कर्ष गुट्टे आिण ट्रेसर सय्यद सलीम यांनी संगणमताने बनावट दस्तावेज तयार करुन बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी हडपण्याचे प्रकार केले आहे. नालायकपणाचा कळस म्हणजे या दोघांना हिंदू स्मशानभूमीची जागाही पुरली नाही. गुट्टे, सलीम यांनी शहरातील सर्व्हे नंबर 28 मधील भगवानबाबा मंदिरा शेजारी असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या पूर्वेकडील (खासबाग देवी ते स्मशानभूमी ते बार्शी रोडकडे जाणारा रस्ता) या जागेची चतु;सिमा चुकीच्या पध्दतीने बदलून बनावट दस्तावेज तयार केले आणि सदरील जमीन हडपण्याचा या दोघांना कुटील डाव होता. एवढेच नव्हे तर या जागेवर काही लोकांना अतिक्रमण करायला लागवून जाणून बुजून हिंदु मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न गुट्टे, सलीम यांनी मिळून केला आहे. सदरील बाब शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हिंदु स्मशानभूमीची जमिन हडपून दोन समाजात तेढ निर्माण करणारे तत्कािलन सी.ओ. गुट्टे व ट्रेसर सय्यद सलीम यांच्यावर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना निलंबित करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सदरील प्रकरणाची कायदेशीर कार्यवाही करुन गुट्टे, सलीम यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यानंतर सर्व प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करावा अशी असेही आदेशात म्हटले आहे.
*मुळूक यांच्यामुळे हिंदु-मुस्लिम सलोख राहिला अबाधित*
सी.ओ. गुट्टे, ट्रेसर सलीम यांनी हिंदु स्मशानभूमीची जमीन हडपण्याचा प्रकार म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासासारखे आहे. हिंदु स्मशानभूमीची जमीन हडपायची आणि त्यावर मुद्दाम काही लोकांना अतिक्रमण करायला लावायचे. यातून हिंदु, मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव या दोन्ही नतद्रष्ट औलादींचा होता. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष घातले. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व पुरावे जमा करुन मुळूक यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा गुट्टे, सलीम यांचा डाव हाणून पाडला. मागील सहा महिन्यापासून सुरू असलेला हा प्रकाराचा कुठलाही गाजावाजा न करता सचिन मुळूक यांनी शांततेत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून दोन्ही समाजात गैरसमज पसरणार नाही याचीही मुळूक यांनी काळजी घेतली.