प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून काही जणांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येत होत्या, यामुळे येथील शांतता भंग होत होती. यातच नांदुरघाट येथे दोन गट आमने-सामने येत दगडफेक सुद्धा या ठिकाणी झाले होती. या सर्व बाबीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी संबंधित ठाणेदारांना योग्य त्या सूचना केल्या होत्या. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने आता जिल्हाभरात कारवाया सुरू झाल्या आहेत आतापर्यंत 42 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
समाजातील व्यक्ती. राजकीय नेते, दोन वेग. वेगळ्या समाजाविषयी आक्षेपार्ह पोष्ट समाजमाध्यमांवर प्रसारीत करून शांतताभंग करण्याचे काम करण्यार्या 42 समाजकंटकांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. हि कारवाई पो स्टे. आष्टी. यु वडगाव. अंबाजोगाई शहर, अंबाजोगाई ग्रामिण व इतर ठीकाणी कलम 107.109.108, 140 नुसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबर संबंधीत युवकांना ठाण्यात बोलावून ताकीद देण्यात आली आहे. तसेच यु. वडागाव येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच बरोबर सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत. आक्षेपार्ह पोष्ट सोशल मिडीयावर प्रसारीत करणान्या समाजविघातक व्यक्तीवर बीड जिल्हा सायबर विभाग लक्ष देवून आहे. आक्षेपार्ह पोष्ट करणांवर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी संबंधित ठाणेदारांना योग्य त्या सुचना केल्या होत्या, त्याच अनुषंगान सध्या कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत.