आसरडोहमध्ये पंकजाताई मुंडे यांचे रमेश आडसकरांनी केले जबरदस्त स्वागत
पंकजाताईंच्या पाठीशी मतांची ताकद उभी करण्याचा निर्धार
धारुर ।भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे आपल्या जिल्हयाला लाभलेलं एक सक्षम नेतृत्व आहे तर दुसरीकडे समोरचा उमेदवार कोण यापेक्षा त्या उमेदवाराचा अनुभव आपल्या परिसरातील सर्वच लोकांना आलेला आहे, त्याबद्दल वेगळे सांगायची आपल्याला गरज नाही. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना हाबाडा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत भाजप नेते रमेश आडसकर यांनी विरोधकांचा जाहीर सभेत खरपूस समाचार घेतला. दरम्यान आसरडोह येथे काल आडसकर यांनी पंकजाताई मुंडे यांचे जबरदस्त स्वागत केले.
पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ
गुरूवारी संध्याकाळी आसरडोह येथे झालेल्या पंचक्रोशीतील मतदारांनी मोठी गर्दी केली होती. पंकजाताईंचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत त्यांचं जबरदस्त स्वागत केले. व्यासपीठावर माधवराव निर्मळ यांचेसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आडसकर म्हणाले, आपल्या जिल्ह्याचा चांगला विकास कोण करु शकतयं याचा विश्वास आपल्याला पंकजाताईंमध्ये दिसतो. मंत्री असताना त्यांनी देशात सर्वाधिक ९५६ कोटींचा विमा जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. पिकविमा असेल अतिवृष्टीचे अनुदान असेल, शेतकर्यांना कोणतेही अनुदान देण्याचे काम पंकजाताईंच्या माध्यमातून झाले आहे. अनेक मोठी कामे पंकजाताईंच्या नेतृत्वात यापूर्वी मार्गी लागली आहेत. त्यामुळे भविष्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी पंकजाताईच सक्षम नेतृत्व आहेत, याची जाण ठेवून या लोकसभा निवडणूकीत जातीवाद, गट-तट विसरुन एकदिलाने पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्य देवून विजयी करा.
आज मोठी लग्नतिथी असतानाही सभेला मोठी गर्दी झाली. याबद्दल आभार व्यक्त करत रमेश आडसकर म्हणाले, पंकजाताई मुंडेे यांना आपल्या भागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे. जातीपातीच्या राजकारणासाठी नव्हे तर विकासासाच्या राजकारणासाठी आपण सर्व जण काम करतो आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून पंकजाताईंनी विकासाची प्रलंबित कामे मार्गी लावलेली आहेत, जिल्ह्यात दुष्काळ पडला त्यावेळी पशूधन वाचवण्यासाठी छावण्या देण्याचे काम पंकजाताई मुंडेंनी केले. कोव्हिड काळातही पंकजाताईंनी सत्ता नसतानाही या भागातील लोकांसाठी मोठे काम केले. धारुरला कोव्हिड सेंटर सुरु केले, याची जाण आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आता पंकजाताई बीड जिल्ह्याच्या खासदार झाल्या तर जिल्ह्याचा सर्व बाजूने विकास होण्यास मदत होणार आहे, त्यासाठी येत्या १३ तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून पंकजाताईंना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं .