हा वाढता अस्वस्थपणा कशाचे धोतक
आष्टी/ब्रम्हगाव:- “लोक काही ऐकेनात ” अस म्हणणाऱ्या सरपंचांनी यापुढे गावच्या विकास कामासाठी लोकप्रतिनिधींच्या दारात येवू नये असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पालक मंत्री आणि त्यांच्या उमेदवारांनी आता मते मागण्यासाठी जनतेच्या दारात जाण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याची टीका महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील ब्रम्हागाव येथे केला
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथे श्रंगेश्वरी देवीची आरती केल्या नंतर गावकऱ्यांनी गावातून सजवलेल्या बैलगाडीतून तुताऱ्या वाजवीत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. तसेच बजरंग बप्पा यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले.
यावेळी बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, पालकमंत्र्यांनी सभेत बोलताना म्हटले होते की, जर गाव सरपंचाचे ऐकत नाही तर मग सरपंचानी कामासाठी त्यांच्या आमदारांच्या दारात जावू नये. असे वादग्रस्त विधान केल्याच्या पार्श्ववभूमीवर त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, पालकमंत्री अशा पद्धतीने बोलत असतील तर त्यांना मते मागण्यासाठी लोकांच्या दारात जाण्याचा नौतिक अधिकार नाही. त्यांचे हे वक्तव्य लोकशाहीचा गळा घोटणारे आहे . यातून ते हताश झाल्याचे दिसते असा टोलाही त्यांनी लगावला .
माझ्या जातीचे प्रमाणपत्र भर सभेत दाखवता आता पर्यंत आम्हाला या कुणबी जातीच्या सवलतीपासून वंचित ठेवले आणि आता आम्ही प्रमाणपत्र काढले तर पालकमंत्री आणि उमेदवाराच्या पोटात का दुखते . मला आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळेच जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने शेतीसाठी आवश्यक वस्तूंच्या किमती चौपट करून त्यांच्या आयुष्याशी खेळ चालवला असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला
तसेच जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या रेल्वेप्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि आपण निवडून गेल्यानंतर दोनच वर्षात रेल्वे परळीपर्यंत नेहून दाखवू व जिल्हावासियांची स्वप्नपूर्ती करू असे स्पष्ट आश्वासन त्यांनी यावेळी दिले तर तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रकल्प उभारू व त्यांच्या हाताला काम देऊ असेही ते म्हणाले
यावेळी बजरंग बप्पा यांच्या सोबत माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, राम खाडे, डॉ. विलास सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.