बीड प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी ने प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे बीड, गेवराई, माजलगाव, परळी,अंबेजोगाई,केज,आष्टी, पाटोदा शिरूर आदी ठिकाणी मतदाराच्या भेटी घेतल्या ठिकठिकाणी उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून नको महायुती नको महाविकास आघाडी आता हवी वंचिताची वंचित बहुजन आघाडी असे मतदार बोलून दाखवत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकी मीच विजय होणार हे मात्र निश्चित आहे.मोठे शक्ती प्रदर्शन करत आपण
गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी अँड. प्रकाश आंबेडकर, रेखाताई ठाकूर ,राज्य प्रवक्ते फारूक अहमद,राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, प्रा.विष्णु जाधव ,अरून आबा जाधव व सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत अशी माहिती अशोक हिंगे यांनी सांगितली .
पुढे बोलताना हिंगे म्हणाले की महाराष्ट्र सरकारने व केंद्रातील सरकारने जनते ला महागाई च्या खाईत लोटले आहे तर आरक्षणाच्या नावाखाली सर्वच समजला झुलवत ठेवण्याचे काम केले आहे महायुती, महाविकास आघाडी हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत म्हणून जनतेने यांना सत्ते पासून दूर ठेवण्याचा निश्चिय केला आहे व वंचित बहुजन आघाडीला पाठींबा मिळत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे अशोक हिंगे यांनी सांगितले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पायी रॅलीने दिं 25/4/2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करून समारोप पारस नगरी शासकीय विश्रामगृहाच्या मागे होईल तरी मतदार बंधु भिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आशीर्वाद द्यावेत अशी विंनती अशोक हिंगे यांनी केली आहे.