-विश्वास पाटील यांच्या सांगण्यावरुन कोण-कोणते कर्मचारी हप्ते घेत होते? याची सुद्धा चौकशी करा
-बीड ग्रामिण पोलीस ठाण्यातील रक्षकच बनले भक्षक
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी पोलीस बांधव सदैव तत्पर असतात. परंतू काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे वर्दीला डाग लागतो. बीड ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैद्य धंद्यांची चलती होती. त्यातच गेल्या दोन दिवसापुर्वी एसीबीने येथील एका कर्मचाऱ्यास 300 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. यामुळे येथील कारभार चव्हाटयावर आला. रिक्षा चालकांकडून 300 रुपये हप्ते घेतला जात असेल तर टिप्पर, अवैद्य गुटखा, अवैद्य दारु, अवैद्य दारुचे कारखाने, अवैद्य पत्याचे क्लब यासह इतरांकडून किती हप्ता घेतला जात असेल या मथळ्याखाली ‘सायं.दैनिक प्रारंभ’ मध्ये गुरुवारी (ता. 30) वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. याचीच दखल घेत पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ठाणे प्रमुखाची बदली केली. अधिक्षकांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले परंतू पकडला तो चोर व इतरांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकाराची सविस्तर चौकशी करुन यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
गेल्या काही महिन्यापासून बीड ग्रामिण पोलीस ठाणे प्रमुखपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. पाटील आल्यापासून बीड ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट होता. या सर्व प्रकाराकडे पाटील का दुर्लक्ष करत आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यात एसीबीने येथील एका कर्मचाऱ्यास 300 रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. यानंतर ठाण्यातील कारभार चव्हाट्यावर आला. यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन करत ठाणे प्रमुखाची बदली करण्यात आली परंतू असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाया करण्याची गरज आहे. विश्वास पाटील यांच्या सांगण्यावरुन कोण-कोणते कर्मचारी पैसे घेत होते का? याची सुद्धा सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासह त्यांनी ठाण्यात पदभार घेतल्यापासून ते बदली होई पर्यंत केलेल्या तपासांची सखोल चौकशी करुन यात जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या अवैद्य धंद्यावाल्याकडून कोणते कर्मचारी हप्ते घेत होते?
बीड ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरु होते. यात मध्यंतरी दारु बंदी विभागाने ग्रामिण ठाणे हद्दीतील एक दारुचा कारखाना सील केला. हे ग्रामिण पोलीसांना माहित नव्हते का? यासह ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीत पंकज कुमावत यांच्या पथकाने अवैद्य गुटखा मोठ्या प्रमाणात पकडला, हे येथील पोलीसांना माहित नव्हते का? यासह इतरही कारवाया पंकज कुमावत यांच्या पथकाने केलेल्या आहेत. यामुळे बीड ग्रामिण पोलीस का दुर्लक्ष करत होते, या लोकांकडून बीड ग्रामिण ठाण्यातील कोणते कर्मचारी हप्ते घेत होते, याची आता सविस्तर चौकशी होणे गरजेचे आहे.