लाच प्रकरणी दोघे ताब्यात; बीड एसीबीची कारवाई
महिन्याला ३०० रुपये प्रत्येक रिक्षा चालकांकडून केले जातात वसूल
प्रारंभ न्युज
बीड : बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यापासून अनागोंदी कारभार सुरू आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा चालकांकडून तीनशे रुपये महिन्याप्रमाणे हप्ता वसुली सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन महिन्याचे सहाशे रुपये हप्ता घेताना येतील एका पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीने पकडले. यासह एका खाजगी इसमास सुद्धा ताब्यात घेतले असून याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अनिल कचरू घटमल, वय 32 पोलीस शिपाई पोलीस स्टेशन बीड ग्रामीण,
व अनिकेत सुभाष कवडे वय-23 व्यवसाय- टपरी चालक रामनगर अशा दोघांना आज एसीबीने ६०० रुपयांची लाच प्रकरणी ताब्यात घेतले. घोडका राजुरी ते बीड शहर या रस्त्यावर रिक्षा ने प्रवासी वाहतूक करण्यासाठी संबंधित चालकांकडून प्रत्येक महिण्याला ३०० रुपये घेतले जात होते. यालाच कंठाळून संबंधित रिक्षा चालकांने या संदर्भात एसीबीकडे तक्रार केली होती. याच अनुषंगाने आज एसीबीने सापळा रचून दोघांना लाच प्रकरणी ताब्यात घेतले. हि कारवाई पोलीस अधिक्षक संदिप आटोळे, प्रभारी अप्पर पोलीस अधिक्षक राजीव तळेकर, पोलीस अधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, सहसापळा अधिकारी -युनुस शेख, सुरेश सांगळे , श्री खेत्रे, श्रीराम गिराम, भरत गारदे, श्री कोरडे, श्री खरसाडे, अविनाश गवळी, चालक-अंबादास यांनी केली.