बीड । जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी नवरात्री निमित्त महिला पोलीस पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने 20 ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान अवैध वाळू वाहतुक करणारे तीन हायवा पकडले. कामखेडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 18 ब्रास वाळू व तीन हायवा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सलमान सलिम मिर्झा (वय 25, रा. तेलगांव नाका,बीड), युवराज ज्ञानोबा वडमारे (वय 38,रा. बेलापुर, ता. बीड) व नवनाथ ज्ञानोबा कोकरे (वय-38,रा.बागपिंपळगांव, ता.गेवराई) अशी कारवाई झालेल्या हायवा चालकांची नावे आहेत.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी नवरात्री उत्सवानिमित्त सहाय्यक निरीक्षक प्रभा दासराव पुंडगे यांच्या अधिनस्त एक महिला पोलीस पथक स्थापन केले आहे. या पथकाचे प्रमुख व त्यांचे समवेत मपोशि ए. एम. वंजारे, ए. एस. शिंदे, व चालक पोशि. डी.व्ही.राऊत हे 20 रोजी अवैध धंद्यावर केसेस करण्यासाठी रात्रीची पेट्रोलिंग करीत होते. कामखेडा परिसरात अवैध वाळु वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने पाहणी केली असता तीन भारतबेंझ हायवा वाळुने भरलेले जातांना दिसले. त्यांची चौकशी करुन हायवाचे चालक यांना वाळु बाबत विचारणा केली असता हायवामधील वाळुबाबत त्यांचेकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कारवाई झाली.