बीड प्रतिनिधी – शहरातील गॅरेज लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकू नाना स्मृती प्रवेशद्वार ते शाहूनगर रस्ताकामाचे उद्घाटन बुधवार (दि.११) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिकांच्या हस्ते केले. तसेच बीड शहरात सुरू असलेल्या मुख्य रस्ताकामाची देखील पाहणी आ.क्षीरसागर यांनी केली.
शहरातील जालना रोडवर असलेल्या गॅरेज लाईन म्हणजेच काकू-नाना प्रवेशद्वार ते शाहूनगर येथील रस्ता व नालीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी निधी मंजूर करून बुधवारी (दि.११) स्थानिक नागरिकांच्या हस्ते, या रस्ता व नालीबांधकामाचे उद्घाटन करून सदरील कामास प्रत्यक्ष सुरूवात केली. तसेच शिरापूर धुमाळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (NH 561) व बार्शी नाका ते जरूड (361 F) या रस्ताकामांतर्गत बीड शहरात नाली व रस्ता बांधकाम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाचीही पाहणीही आ.क्षीरसागर यांनी केली. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्या सोबत माजी आ.सय्यद सलीम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कर्मचारी, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कामाचे कंत्राटदार तसेच नागरिक उपस्थित होते.