रक्तदान शिबिरात युवकांनी सहभागी व्हावे – राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने आणि गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग तपासणी शिबिरातील पात्र लाभार्त्यांना सहाय्यक साधनांचे निशुल्क वितरण केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले. जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. केज आणि बीड तालुक्यातील पात्र दिव्यांगांना सकाळी 11.00 वा. एम आय डीसी परिसरातील मॉं वैष्णो देवी पॅलेस येथे हा वितरण कार्यक्रम संपन्न होईल. पात्र दिव्यांग बांधवांनी ओळखपत्रासह उपस्थित राहावे. तसेच लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर पूर्व तयारी बैठक संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीस प्रा. देविदास नागरगोजे, नवनाथ अण्णा शिराळे, सलीम जहागीर, चंद्रकांत फड, डॉ. लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, सुनील मिसाळ, बालाजी पवार, ज्योतिबा नन्नवरे, राजू शहाणे, सोमनाथराव माने, अनिल चांदणे, बद्रीनाथ जटाळ, जमीलभाई, बापू जाधव, ज्ञानेश्वर आंधळे, गणेश तोडेकर, शफिक पेंटर, कल्याण पवार, महेश सावंत, नरेश पवार, गणेश सांगुळे, प्रणव आणेराव, महेश भिसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.