आयुष्यमान भारतच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सीएस, डीएचओंनी घेतला निर्णय
बीड : – सरकारी क्षेत्रातील रुग्णसेवा देणार्या डॉक्टरांना, आरोग्य कर्मचार्यांना नियमित वेतन/मानधनाबरोबरच रुग्णसंख्येच्या आधारावर तसेच विविध योजनेतून करणार्या शस्त्रक्रियेचा येणार्या मोबदल्यातून डॉक्टर्स, नर्स सह इतर कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता देणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडळा यांनी आयुष्यमान भारतच्या पाचव्या वर्धापनदिनामित्त निर्णय घेत सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ.लक्ष्मीकांत तांदळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ.हनुमंत पारखे, मेट्रन रमा गिरी, डॉ.गावडे, जिल्हा समन्वयक श्रीराम राठोड, डॉ.आगलावे, विशाल बेदरे, जिल्हा समन्वयक डॉ.अशोक गायकवाड यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरिब रुग्णांना वेळेत व दर्जेदार रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी काम करत असतांनाच विविध योजनेतील शस्त्रक्रियाही वाढल्या तर शासकीय यंत्रणेला त्याचा बेनिफीट उपलब्ध होतो. मात्र या काम करणार्या डॉक्टर्स नर्स यासह इतर कर्मचार्यांनाही त्यांच्या कामाचा प्रोत्साहन मिळाले तर अति जोमाने काम केले जाते. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांनी आयुष्यमान भारतच्या पाचव्या वर्धापनादिनानिमित्त निर्णय घेत जिल्हा रुग्णालयासह इतरत्र ठिकाणच्या शासकीय यंत्रणेमध्ये विविध योजनेतून शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचार्यांना त्यांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याचे सांगितल्याने डॉक्टर्स, नर्स सह इतर कर्मचार्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. शासनाकडून येथील डॉक्टरांनाही योजनेतून शस्त्रक्रिया केल्यानंतर निधी बरोबर प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. परंतू मागील काळात हा भत्ता आतापर्यंत एकाही डॉक्टर्स नर्स सह इतर कर्मचार्यांना वरिष्ठांकडून देण्यात आलेला नाही. यामुळे डॉक्टरांसह कर्मचार्यांमध्ये याबाबत नाराजी होती. परंतू रुग्णसेवेबरोबरच आपल्या कर्मचार्यांच्याही हितासाठी काम करणारे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ.नागेश चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे डॉ.नागेश चव्हाण यांनी आपले पदभार घेतल्यानंतर अवघ्या एक महिन्यामध्ये आरोग्यसेवेबरोबरच इतर सेवाही सुरळीत करण्यात सक्षम झाल्याचे दिसून येते.
उत्कृष्ट सेवा देणार्यांचा होणार विशेष गौरव
राज्यातील संपूर्ण शासकीय रुग्णालयामध्ये 15 ऑगस्टपासून संपूर्ण सेवा मोफत करण्यात आली आहे. यामुळे शासकीय यंत्रणेकडे रुग्णांना अधिकचा कल वाढला असल्याने यंत्रणेवर तणाव येत असतांनाही सक्षमपणे रुग्णसेवा संभाळत काम करतांना कर्मचारी दिसत आहे. त्याचबरोबर योजनेतील शस्त्रक्रियाबरोबरच रुग्णसेमध्ये उत्कृष्ट सेवा देवून काम करणार्या अधिकार्यांसह कर्मचार्यांचाही विशेष गौरव केला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडळा यांनी सांगितले आहे.