एसीबीचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या टीमची कामगिरी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : दिवसेंदिवस पोलीस विभागासह इतर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, शासकीय कामासाठी सर्वसामान्यांकडून मोठी रक्कम लाच स्वरूपात स्वीकारले जाते, अशीच घटना आज बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उघडकीस आली. 363 गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक न करण्यासाठी येथील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी 28 हजाराची लाच टप्प्याटप्प्याने स्वीकारले. यामध्ये आज दहा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी पळून गेले होते, परंतु एसीबीच्या टीमने त्यांना पाठलाग करून दोघांही पकडले.
शिवाजीनगर ठाणे हद्दीमध्ये एक 363 गुन्हा मध्यंतरी घडला होता, यातील आरोपीला अटक न करण्यासाठी व पोलिसांनी जप्त केलेली चार चाकी सोडून देण्यासाठी येथील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने व पोलीस कर्मचारी रंजीत पवार या दोघांनी संबंधितांकडून 28 हजार रुपये टप्प्याटप्प्याने स्वीकारले. आज यातील दहा हजाराची रक्कम स्वीकारताना या दोघांनाही एसीबीने रंगेहात पकडले. यात विशेष म्हणजे ही रक्कम घेतल्यानंतर हे दोघेही पळून जात होते, परंतु एसीबीच्या टीमने यांचा पाठलाग करून या दोघांनाही जेरबंद केले. ही कारवाई एसीबी बीड विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या टीमने केली