पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे केले अभिनंदन
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून अनाधिकृत पिस्टल चे प्रमाण वाढले असून छोट्या मोठ्या वादामध्ये पिस्टल वापरल्या जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या संदर्भात विशेष सूचना केल्या होत्या, यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी या अनुषंगाने त्यांच्या टिमला कामाला लावले होते. बीड शहरात अनाधिकृत पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तीन जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तीन पिस्टल जप्त केल्या आहेत, या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले.
बीड जिल्हयामध्ये अवैध रित्या अग्नीशस्त्र बाळगणांराची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कायदेशिर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी आदेशित केल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक, बीड व मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, येथील एक पथक स्थापन करुन जिल्हयामध्ये अवैध रित्या अग्नीशस्त्र बाळगणारे इसम यांचा शोध घेत असतांना दिनांक 09/08/2023 रोजी मा. पो. नि. स्था. गु.शा. बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सागर प्रकाश मोरे व वैभव संजय वराट हे सरस्वती विदयालय समोर, जुना धानोरा रोड, बीड येथे विनापरवाना बेकायदेशिर रित्या स्वतः जवळ गावठी पिस्टल बाळगत उभे आहेत. त्यावरुन सदर ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी वरील दोन इसम मिळुन आले त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव त्यांचे 1) सागर प्रकाश मोरे वय 22 वर्ष रा. जिजाऊ नगर, जुना धानोरा रोड, बीड 2) वैभव संजय वराट वय 21 वर्ष रा. स्वराज्य नगर, बीड असे सांगितले त्यांचे अंगझडती मध्ये दोघाकडे प्रत्येकी एक-एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल ) व 05 जिवंत काडतुस मिळुन आले. त्यानंतर आरोपींतांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस सदरचे गावठी पिस्टल कोठुन व कोणाकडुन आणले आहे. त्यावर त्यांना सदरच्या गावठी पिस्टल आम्ही सुयोग ऊर्फ छोटया मच्छिद्र प्रधान रा. स्वराज्य नगर, बीड ह.मु. जिजामाता चौक, बीड यांच्याकडुन घेतले आहेत व त्याने व आम्ही एक गावठी पिस्टल शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख रा. आजमेर नगर, बालेपीर, बीड यास विक्री केलेले आहे व तो सध्या पोलीस पेट्रोलपंप समोर बालेपीर येथे उभा आहे. असे सांगितल्याने आम्ही लागलीच सदर ठिकाणी जाऊन शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख वय 21 वर्ष रा. आजमेर नगर, बालेपीर, बीड यास ताब्यात घेवून त्याचे अंगझडती मध्ये एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल ) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले. यातील 1) सागर प्रकाश मोरे वय 22 वर्ष रा. जिजाऊ नगर, जुना धानोरा रोड, बीड 2) वैभव संजय वराट वय 21 वर्ष रा. स्वराज्य नगर, बीड 3) शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख वय 21 वर्ष रा. आजमेर नगर, बालेपीर, बीड यांचेविरुद्ध फिर्यादी नामे श्रीराम खटावकर पोलीस उप-निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्री सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संतोष साबळे पोलीस निरिक्षक स्थागुशा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, पोना- विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि- सचिन आंधळे, नारायण कोरडे, विकी सुरवसे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.