110 ठेवीदारांच्या तक्रारीवरी नऊ जणाविरोधात गुन्हा नोंद
तीन कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेटने ठेवीदारांच्या कोटी रुपयांच्या ठेवी स्वतःच्या स्वार्थासाठी इतर ठिकाणी वापरून दीडशे ते 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पहिला गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर दुसरा गुन्हा नेकनूर पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. त्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी ठाण्यामध्ये तिसरा गुन्हा दाखल झाला असून 110 ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नऊ जणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. या ठिकाणी सुद्धा तीन कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रारंभ
जास्त पैशाचे आमिष दाखवून, त्यांना बँकेत पैसे ठेवण्यासाठी विनवण्या करत अनेक बँकेमध्ये कोटी रुपयांच्या ठेवी ठेवून घ्यायच्या व त्या ठेवी स्वतःच्या स्वार्थासाठी इतर ठिकाणी गुंतवायच्या त्या ठिकाणी तोटा झाल्यानंतर मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्यास टाळाटाळ करायची असे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. प्रारंभ बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक बँका बुडाल्या आहेत. त्यामध्ये बीड शहरातील जिजाऊ माॅसाहेब मल्टीस्टेटचे प्रकरण ताजेच आहे. जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेट मध्ये दीडशे ते दोनशे कोटींच्या ठेवी असून 2600 ठेवीदारांचा पैसा या बँकेत अडकला आहे. आत्तापर्यंत बाराशे ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी करत 65 कोटीच्या फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर नेकनूर मध्ये सुद्धा गुन्हा नोंद झाल्यानंतर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. प्रारंभ यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यातील इट या ठिकाणी सुद्धा जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेटची शाखा होती. या शाखेमध्ये तीन कोटी 32 लाख रुपयांची फसवणूक झाल्यास प्रकरणी 110 ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीमध्ये जिजाऊ माॅंसाहेब मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनीष बबन शिंदे, योगेश करांडे, आश्विनी सुनीता वांढरे, अशोक गोविंद लावंडे, शिवराज शशिकांत बिरबले, शंकर भास्कर हाडूळे, अमोल नामदेव पवार या नऊ जनाविरोधात अनुरथ बाबुराव महाकले यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.