शहरात ठिकठिकाणी छापे; 28 सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद अनेक वाहनांची केली मध्यरात्री तपासणी
कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस दल 24 तास तत्पर
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात कायदा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल २४ तास बीडकरांच्या सेवेत आहेत. जिल्ह्यात गुन्हेजारीवर नियंञण व वचक राहावे या अनूषंगाने गुरुवारी (ता. १३) मध्यराञी दिडला अचानक पोलीस प्रशासनाच्या वतिने कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यात २८ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. यासह अनेक वाहनांची तपासणी सुद्धा करण्यात आली. हि मोहिम पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर व पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके हे वरिष्ठ अधिकारी या कारवाईसाठी मोठा फौज फाटा घेऊन रस्त्यावर उतरले होते.
बीड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण व वचक बसविणेकरीता बीड शहरात गुरुवारी मध्यराञी कोबिंग आॅपरेशन करण्यात आले. यात सराईत असलेले २८ गुन्हेगार ताब्यात घेण्यात आले. हि कारवाई शहरातील विविध भागात करण्यात आली. यावेळी ११० वाहनांची तपासणी सुद्धा करण्यात आली. या मोहिमेमुळे माञ गुन्हेगारी करणार्यांची धावपळ दिसून आली. विशेष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, पोनि राठोड, पोनि बंटेवाड, पोनि काशिद, पोनि पाटील, तसेच 70 पोलीस अंमलदार, 01 आरसीपी प्लाटून यांचे उपस्थितीत बीड शहरात कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. यात 02 प्रोव्हीशन रेड सुद्धा करण्यात आल्या. तसेच बीड शहरातील गुन्हेगारी वस्ती चेक करुन त्यामध्ये 17 रेकॉर्डवरील सराईत / हिस्ट्रीसिटर चेक करण्यात आले आहेत.