जनतेच्या प्रेमामुळे मंत्री धनंजय मुंडे भारावले
रात्रीचा प्रवास करत मंत्री मुंडे मुंबईत दाखल
सामाजिक न्यायमंत्री खात्यासह बीडचे पालकमंत्रीपद मंत्री मुंडेंकडे येणार?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कठिण काळात या माझ्या माय बाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला याचे उपकार मी आयुष्यभर विसरु शकणार नाही. तसेच तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसून जिल्ह्याची मान उंचावल्या शिवाय राहणार नसल्याचे मत गुरुवारी (ता. 13) परळी आयोजित सभेत व्यक्त मंत्री धनंजय मुंडे व्यक्त केले. जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे काल मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. ठिक-ठिकाणी स्वागतासाठी नागरीक उभे राहून मंत्री मुंडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत होते. हे पाहूण मंत्री धनंजय मुंडे काल भारावून गेले. दिवसभर लोकांचे आशिर्वाद घेऊन रात्रीचा प्रवास करत मुंडे हे मुंबईत दाखल झाले असून त्यांना आज चांगले खाते मिळणार असल्याची शक्यता आहे. आज पर्यंतच्या प्रवासात मंत्री धनंजय मुंडे यांचे कालचे स्वागत अभूतपुर्वच होते.
बीड जिल्ह्यातील नेते नेहमीच राज्याच्या व केंद्राच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजावत आलेले आहेत. पुर्वीच्या नेत्यांमध्ये स्व.केशर काकू, स्व.गोपीनाथ मुंडे, स्व. विनायक मेटे यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांची राज्याच्या राजकारणात व केंद्रात आप-आपली एक वेगळी छाप होती. सध्याच्या राज्याच्या राजकारणात सुद्धा मंत्री धनंजय मुंडे मोलाचे योगदान देत असून महत्वाची भुमिका बजावत आहेत. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कडा पासून सकाळी सुरु झालेला दौरा रात्री साडे नऊ पर्यंत सुरुच होता. परळीतील सभेत मंत्री धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त करत जनतेचे आभार मानत जिल्ह्याची मान उंचावल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे मत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात मंत्री मुंडे यांचे भव्यदिव्य स्वागत झाल्यानंतर रात्रीचा प्रवास करत मुंडे हे मुंबईला गेले अजून आज त्यांना चांगले खाते मिळणार असल्याची शक्यता आहे. यासह जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुद्धा धनंजय मुंडे यांच्याकडे येणार असल्याचे बोलले जात आहे.