बीड प्रतिनिधी :- आ.संदीप क्षीरसागर यांनी शनिवार (दि.24) रोजी बीड नगर परिषद प्रशासनाची आढावा बैठक घेऊन, यापूर्वी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे पालन झाले की नाही याबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून निर्देश दिले.
सध्या माजलगाव बॅकवॉटरमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असुन देखील बीड शहरातील 19 झोनला समान पाणीपुरवठा होत नाही. काही झोनमध्ये जास्त, तर काही झोनमध्ये कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. बीड नगर परिषदेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आ.संदीप क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांच्या विविध समस्यांबात माहिती दिली होती. या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करणे बाबत सूचना दिल्या. यावेळी माजी आ.सय्यद सलीम उपस्थित होते.