आपला ब्रॅण्ड आपल्याच गावातून मोठा होतो-सुरेश कुटे
ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना बँकिंग क्षेत्राशी जोडले
द कुटे ग्रुपची बँकींग क्षेत्रातही गगनभरारी
ज्ञानराधाच्या शिवाजीनगर शाखेच्या सातव्या वर्धापन
दिनानिमित्त ग्राहकांनी दिल्या भरभरून शुभेच्छा!
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : द कुटे ग्रुप गेल्या काही वर्षात नावारूपाला आला असून कुटे ग्रुपने खऱ्या अर्थाने बीडची ओळख संपूर्ण जगाला करून एक ब्रॅण्ड बनवला आहे. कुटे ग्रुप बनवत असलेले सर्वच प्रोडक्ट दर्जेदार असून त्या प्रोडेक्टला मार्केटमध्ये चांगली पसंती मिळत आहे. याचबरोबर बँकींग क्षेत्रात सुद्धा कुटे ग्रुपने ज्ञानराधाच्या माध्यमातून चांगली भरारी घेतली आहे. सोमवारी बीड शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या ज्ञानराधा शाखेचा सातवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी ग्राहकांनी द कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांना व त्यांच्या टिमला पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सुरेश कुटे म्हणाले की, आपला ब्रॅण्ड हा आपल्याच गावात मोठा होतो, आमच्या या यशामध्ये बीडकरांचा मोलाचा वाटा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बीड जिल्हा ग्रामीण भाग म्हणून व मागासलेला भाग म्हणून सर्वत्र परिचित आहे. परंतु याच जिल्ह्यातला सर्वसामान्य कुटुंबातील एक युवक उद्योगक्षेत्रात येतो व गगनभरारी घेतो यामध्ये फक्त स्वत:चाच विकास न करता बीड जिल्ह्यातील बेरोजगारी सुद्धा कमी करण्यासाठी पुढाकार घेतो. द कुटे ग्रुपने जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार देत त्यांना सक्षम करण्याचे काम केले. यामध्ये महिलांना सुद्धा सक्षम करण्याचे काम कुटे ग्रुप करत असून कुटे ग्रुपने जे जे ब्रॅण्ड बनवले त्या सर्व ब्रॅण्डला मार्केटमध्ये चांगली पसंती मिळत आहे. यासह बँकींग क्षेत्रातसुद्धा द कुटे ग्रुपने ज्ञानराधाच्या माध्यमातून पाऊल ठेवले होते. बँकींग क्षेत्रातसुद्धा ज्ञानराधाने लोकांचा मोठा विश्वास संपादन केला असून बँक आपल्या दारी यासह विविध उपक्रमातून ज्या लोकांना बँकींग क्षेत्राबाबत काहीच माहीत नाही त्या लोकांना बँकींग क्षेत्राशी जोडण्याचे काम सुरेश कुटे व त्यांच्या टिमने केले आहे. यामुळे जो पैसा घरातच पडून आहे तो पैसा मार्केटमध्ये आला व त्या पैशातून दोन पैसे ग्राहकांना मिळू लागले. यासह इतर विषयाचा आढावा घेत द कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी शिवाजीनगर शाखेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आपले मत व्यक्त करताना पुढे सांगितले की, आपला ब्रॅण्ड हा आपल्याच ठिकाणी मोठा होत असतो. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जावू देणार नसून सामाजिक क्षेत्रात फुल ना फुलाची पाखळी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यासह इतर विषयालाही सविस्तर हात घालत त्यांनी बँकेचा आढावा यावेळी ग्राहकांसमोर ठेवला. यावेळी सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.