ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात झाला मोठा वाद
शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची गाडी फोडली!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेनिमित्त होणार्या सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या, याच दरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी मोठा वाद झाला, यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यामध्ये नेमका कोणत्या कारणाने वाद झाला हे मात्र समजू शकले नाही परंतु यांच्या झालेल्या अंतर्गत वादामध्ये मात्र आप्पासाहेब जाधव यांची गाडी वरेकर यांच्याकडून फोडण्यात आल्याचे समजते. यावेळी या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी तात्काळ दोघांनाही शांत करत अंतर्गत असलेला वाद मिटवला.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात शनिवारी होणार असून हि सभा बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील पारस नगरी येथे होत आहे. याच सभेची स्टेज पाहणे करण्यासाठी हा सायंकाळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हे आल्या होत्या, यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. याच दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यामध्ये वाद झाला या वादाचे रूपांतर शिवीगाळ व मारहाणी सुद्धा झाले. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची गाडी सुद्धा फोडण्यात आली. तात्काळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी याप्रकरणी दोघांनाही समजून सांगत हा वाद मिटवला.
याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, हा आमचा आपसातील गैरसमजातून झालेला प्रकार होता. पण आता हा वाद मिटला आहे. वरेकर यांना समजावून सांगितलेले आहे. काहीजण चुकीची माहिती बाहेर देत आहेत. चुकीच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये