-मोठा गाजावाजा करत शहरात आलेले बंसल क्लासेस फक्त नावालाच
-दर्जेदार शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान
-शिक्षण क्षेत्रात राजकिय नेते घुसल्याने शिक्षणाचे होतेय बाजारीकरण
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मुलांच्या भविष्यासाठी मुलांना चांगले शिक्षण मिळावे, मुलांनी आयुष्यात मोठे अधिकारी व्हावे यासह इतर स्वप्नासाठी प्रत्येक पालक आप-आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी धडपडत असतो. याचाच फायदा अनेक जण घेतात. गेल्या दोन वर्षीपुर्वी बीड शहरात बंसल क्लासेस सुरु करण्यात आले होते. सुरुवातीला याठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत होते, त्यावेळेस शिक्षक सुद्धा चांगले होते, परंतू सध्या बंसल क्लासेस मध्ये त्या त्या विषयाचे तज्ञ शिक्षक नसल्यामुळे बंसल क्लासेस फक्त नावालाच उरले आहे. लाखो रुपयांची फिस घेऊन सुद्धा याठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळे पालकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. पालकांची फसवणूक करणाऱ्या असल्या क्लासेसवर संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी चर्चा पालक करु लागले आहेत.
मुलांना योग्य शिक्षण मिळावे, भविष्यात मुलांनी खुप-खुप प्रगती करावी. आपल्याला ज्या समस्या आल्या त्या समस्यांचा सामना मुलांना करण्याची वेळच येऊ नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पालक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडत असतात. स्कुलसह चांगली शिकवण क्लास लावून त्यांना घडविण्यासाठी सर्वच पालकांचे प्रयत्न करत असतात. याचाच फायदा अनेक क्लासेसवाले घेत आहेत. गेल्या दोन वर्षापुर्वी बीड मध्ये बंसल क्लासेस सुरु करण्यात आले होते. या क्लासेसने पालकांना चांगले चांगले स्वप्न दाखवली होती. यालाच फसत अनेक पालकांनी लाखो रुपये भरुन बंसल क्लासेस मध्ये मुलांचा प्रवेश घेतला. सुरुवातीला मुलांना चांगले शिक्षण सुद्धा देण्यात येत होते. परंतू सुरुवातीला बाहेरुन आलेले शिक्षण आता याठिकाणी नसल्यामुळे तो दर्जा आता याठिकाणी राहीला नाही. सध्या याठिकाणी मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांमध्येच दर्जा नसल्यामुळे पालकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करुन सुद्धा चांगले शिक्षण मिळत नसल्यामुळे सध्या बंसल क्लासेसवर पालकांची नाराजगी वाढली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन मुलांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान रोखण्याची गरज आहे.
शिक्षणक्षेत्राला व्यवसाय म्हणून पाहणे चुकीचे!
गेल्या काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अनेक राजकीय नेते उतरले आहेत. यासह इतरही पैसावाले या क्षेत्रात आल्यामुळे शिक्षणांचा धंदा या लोकांनी मांडला आहे. यामुळे सर्व सामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच आता चांगले शिक्षण घ्यायचे ज्यांच्याकडे पैसा नाही त्या मुलांना चांगले शिक्षण मिळणार नाही का? अशी परस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांनी शिक्षणाचा धंदा न करता, मुलांना घडविण्यासाठी शिक्षणक्षेत्राला उभारी देण्याची गरज आहे.