प्रा.किरण पाटलांना बीड जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा जास्त मते मिळतील – आ.बावनकुळे
बीड प्रतिनिधी : आता ठरलं, बीड जिल्ह्याची शिस्त अजिबात बिघडू देणार नाही. एकदा विस्कटलेली घडी सावरणे अवघड आहे. आम्हाला प्रतिष्ठेची भूक अजिबात नाही.विकास निधी जनतेच्या हितासाठी पाहिजे आणि तो प्रोटोकॉल प्रमाणे मिळाला पाहिजे. प्रत्येक नामदाराच्या मागे पुढे पळून, कोणालातरी तोडण्यासाठी आणि कोणालातरी जोडण्यासाठी निधीची खैरात नको. जनता त्यांच्या मागे नाही. जनता आमच्या मागे आहे. जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांची परवड सहन केली जाणार नाही. असे परखड मत लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले. जिल्ह्यातील कार्यकर्ता स्वाभिमानी आहे. आम्ही देलेला शब्द पाळणारा जिल्हा आहे. प्रा.किरण पाटलांना विजयासाठी परिश्रम घेऊ आणि शक्तीही देऊ, आगामी निवडणुकांसाठी हा विजय महत्वाचा ठरेल. असा विश्वास ताईंनी व्यक्त केला.
मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजपा मित्र पक्षाचे उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दौऱ्यादरम्यान बीड येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस खा. डॉ. प्रितमताई मुंडे, आ.सुरेश धस,आ. लक्ष्मण पवार, प्रदेश बसवराज मंगरुळे, माजी आमदार भीमराव धोंडे, केशव आंधळे, अजिनाथ नवले, रमेशराव अडसकर, अक्षय मुंदडा, उमेदवार प्रा. किरण पाटील, डॉ. स्वरूपसिंह हजारी, सर्जेराव तांदळे, सविताताई गोल्हार, नवनाथ शिराळे, जगदीश गुरखुदे, सलीम जहागीर, प्रा. देविदास नागरगोजे, उषाताई मुंडे, निळकंठ चाटे, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, जेडी शहा, जि.प. सदस्य अशोक लोढा, भारत काळे, विजयकांत मुंडे, संतोष हांगे, रामराव खेडकर, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वात आणि कार्तुत्वात आम्ही घडलो.मुंडे साहेबांनी ओबीसी, मराठा, भटका विमुक्त, वंचित, गोरगरीब जनतेला एकत्रीत करून, भाजपाची स्वतंत्र ताकत निर्माण केली. साहेबांच्या संघर्षातूनच माझा राजकीय जीवनाचा प्रवास सुरु झाला.त्यांचा सहवास आणि मार्गदर्शनामुळे एक साधा बूथ प्रमुख आज प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा सांभाळतो आहे. असे गौरोद्गार मुंडे साहेबांचा आदर व्यक्त करत व्यक्त केले. पंकजाताईंशि चर्चा करून, बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र प्रा.किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. किरण पाटील यांच्या उमेदवारीने निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, समर्थ पर्याय भाजपाने दिलेला आहे.
राजेंद्र मस्के यांनी आयोजित केलेली उर्जावान बैठक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तळमळ आणि मेहनत यामुळे प्रा.किरण पाटलांच्या प्रचाराला वेग आला. जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा अधिकची मते मिळतील आणि किरण पाटलांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे कौतुक करत त्यांचे संघटनात्मक कार्य उत्तम आहे.प्रत्येक कार्यक्रम नियोजन बद्ध व जोरात घेतात. पक्षाचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कामाची आणि कार्याची दखल भाजपा प्रदेशने घेतली आहे.
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली काही महत्वपूर्ण पक्षप्रवेश मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
माजी आमदार स्व.चांदमलजी लोढा यांचे सुपुत्र आणि उद्योगपती दिलीप लोढा यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. तसेच कामखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन श्रीराम फाटे यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष प्रवेश केला., अंथरवन पिंप्री येथील उद्धव गट शिवसेनेचे कार्यकर्ते व ग्रा.प. सदस्य जालिंदर शिंदे, भाऊसाहेब पुर्भे, सतीश प्रभाळे, सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीच्या कार्यकर्त्या संगीता कोठारे यांनीही पक्ष प्रवेश केला.मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.