रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा वाहतुक शाखेच्या वतिने जनजागृती
बीड : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान सन 2023 राबविण्यात आले. त्याप्रमाणे यावर्षी दिनांक 11/01/203 ते 17/01/2023 रोजी पर्यंत बीड जिल्हा वाहतुक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला. सदर सप्ताहा दरम्यान शाळा, कॉलेज, महाविदयालय याठिकाणी बैठका घेऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वाहन चालक, ड्रायव्हींग स्कुल, यांच्या चौक सभा घेऊन वाहतुकीच्या नियमा संदर्भात जनजागृती केली. मागील आठ दिवसांमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम राबऊन रस्ते अपघात व अपघातातील मृत्यु कमी करण्याचे दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या उपक्रमाची अंमलबजावणी केली.
त्याअनुषंगाने आज दि. 17/01/2023 रोजी पोलीस मुख्यालय, बीड येथे रस्ता सुरक्षा अभियान 2023 चा समारोपाचा कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या संकल्पनेतुन आयोजित केला. सदर कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर सा., यांचे अध्यक्षतेखाली पार पाडला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. एस. एम. गोडबोले, सचिव विधीसेवा प्राधिकारण, बोड हे हजर होते. सदर कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री माने सा. वाहतुक मदत केंद्र मांजरसुंबा, गेवराई व बीड जिल्हा वाहतुक शाखेचे अधिकारी ” व अंमलदार, आरएसपी चे अधिकारी व कर्मचारी, रिक्षा व वाहन चालक व विविध चालक संघटनेचे पदाधिकारी, विदयार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावणा पोलीस निरीक्षक श्री. एल. व्ही. राख यांनी केली. त्यांनी पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे म्हणजे स्वतःच्या जिवीताचे रक्षण वाहतुक नियमांचे करणे आहे. 2020 मध्ये वाहतुक शाखेने 25,000/- कसुरदार वाहन धारकांवरती केसेस करुन सुमारे 3,00,00,000/- रु दंड वसुल केला आहे. यामध्ये आम्हाला दंड आकरुन कोणत्याही प्रकारचा आनंद होत नाही. यामागील हेतु हा वाहन चालकांचे व त्यामधील प्रवाशांच्या जिवीताचे संरक्षण करणे हाच असतो. मागील 5 वर्षामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये घट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुन सहकार्य करावे असे संबोधित केले.
त्यानंतर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री माने सा. यांनी रस्ता सरक्षा अभियान ही जनतेमध्ये वाहतुक नियमांचे पालन करण्याची माहिती असते परंतु पुन्हा पुन्हा त्याची उजळणी होणे आवश्यक आहे म्हणुन दरवर्षी जानेवरी मध्ये रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते. सदर अभियाना दरम्यान आम्ही वाहन चालकांमध्ये जागृकता निमार्ण होण्याच्या दृष्टीने वेगवेगळया स्वरुपाचे बॅनर लावून, विविध कार्यक्रम घेऊन
जनजागृती केली आहे. तरी आपण व आपल्या जिल्हयातील सर्व नागरीकांनी वाहतुकीचे नियम पाळुन करावे असे बोलून मा. अध्यक्षांची बोलण्याची संधी दिली त्याबाबदल आभार मानले. सहकार्य तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गोडबोले साहेब, सचिव विधी व सेवा प्राधिकरण जिल्हा
न्यायालय, बीड यांनी वाहतुकी सदंर्भाचा कायदा का पाळला जावा ? या विषयी उपस्थित विदयार्थी, नागरीक, वाहन चालक यांना मार्गदर्शन केले तसेच वाहतुकीच्या नियमाप्रमाणे केलेला दंड हा तुम्हा आम्हाला स्वतःचे इतरांचे रस्ते अपघात व रस्ते अपघातांमध्ये मृत्युचे प्रमाण कमी करण्याचा संदेश दिला जातो त्यामुळे आपणास पोलीसांनी आकरलेल्या दंडामुळे बरच काही शिकण्या जोगे असते. स्वतःच्या वाहनाचे इन्सुरंन्स, वाहनाचे कागदपत्र व इतरांच्या जिवीतास धोका न होता वाहन चालविणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणुन पोलीसांनी दिलेला दंड हा बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. म्हणुन आपले वाहनावरील दंड वेळेत भरुन न्यायालात वकील देणे, तारखांना हजर राहणे, केस चालवणे, निकालाची वाट पाहणे या गोष्टी टाळुन आपण तडजोड शुल्क भरुन आपल्या वाहनांवरील दंड वेळेत भरुन घेऊन पोलीसांना सहकार्य करावे असे मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सचिन पांडकर सा. यांनी बीड जिल्हयामध्ये सन 2022 मध्ये 734 वाहनांचे अपघात होऊन अपघातामध्ये 462 नागरिकांचा मृत्यु झाला असुन 461 नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये सदर अपघातांमधील 75% अपघात हे मानवी चुक व अतिवेगाने वाहन चालविल्याने झालेले आहेत. 25% अपघात हे वाहन चालकांनी वाहन चालवितांना सिटबेल्ट न लावणे, मो.सा. चालवितांना हेल्मेट चा वापर न करणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, वाहनांची देखभाल व दुरुस्ती न करणे, मदय प्राशन करुन वाहन चालविणे व रस्त्यावरील लावण्यात आलेल्या सुचना फलकाकडे दुर्लक्ष करणे या कारणांमुळे झालेले आहेत. रस्ते अपघातातील होणारे मृत्यु व वित्त हानी टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम आपण सर्वांनी तंतोतंत पाळावे. तसेच वाहतुकीच्या नियमांची उजळणी व्हावी याकरीता दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राविण्याचा शासनाचा उददेश आहे. म्हणुन आपण सर्वांनी वाहतुक नियमांचे पालन करण्याचा संकल्प करुया असे मार्गदर्शन
सदर कार्यक्रमास उपस्थितांचे सपोनि श्री. कैलास भारती वाहतुक शाखा यांनी कार्यक्राचे प्रमुख्य पाहुणे इतर मान्यवरांचे आभार मानुन अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.