शेतकऱ्यांना अंधारात ठेवून बाधित क्षेत्र कमी दाखवत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची लूट – डॉ.उद्धव घोडके
————–
गेवराई : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रीमियम भरणा केला होता. यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले यामध्ये अंदाजे 55 तर 60 टक्के पर्यंत उत्पादनात घट आली. यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व आवकाळीने थैमान घातले यामध्ये सरासरी 131 टक्के पावसाची नोंद झाली यामुळे सर्व पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन सिम्पल सर्व्हेक्षण करत कमी टक्केवारी दाखवत तालुक्यात 70 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तांत्रिक कारण सांगून रिजेक्ट करण्यात आले असून मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी गेवराई तहसिल कार्यालयासमोर आज सकाळी 11 वाजल्यापासून डॉ.उद्धव घोडके यांच्या नेतृत्वाखाली खाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. असून यामध्ये खरीप 2022 चा पीक विमा भरपाई देताना झालेला अन्याय दूर करा, अतिवृष्टी अनुदान तात्काळ द्या, खरीप 2020 पीकविमा बाबत प्रधान सचिवाच्या आदेशाची अंमल बजावणी करा, खरीप 2023 पासून पीक विमा योजना बंद करा यासह आदी मागण्यासाठी शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या वतीने हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बेदरे, बंडू यादव, रघुनाथ नावडे, राजेंद्र धोत्रे, मोहन यादव, सुदाम भोपळे, महारुद्र खुणे, बंडू सुगडे, भगवान काळे, दत्ता साखरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब आतकरे, आत्माराम भिताडे, डॉ.तुळशीराम खोटे, कचरू बापू पवार, दत्ताभाऊ हत्ते, रंगनाथ यादव, ज्ञानेश्वर लाड, प्रकाश पऱ्हाड, संभाजी कोकणे, बद्रीनारायण पांगरे, राम जिजा चाळक, राजेंद्र धोत्रे, उमेश खेत्रे, सयाजीराव पवार, आत्माराम भिताडे, पुंजाराम ढेंबरे,हनुमान येवले, बाजीराव शिंदे, नानासाहेब पवार, किशोर पानखडे, सुदाम भोपळे,राजेंद्र टकले, भारत पांढरे, आदिनाथ शिंदे, खंडू घोडके, महेश घोडके, भारत पिंगळे, शिवनाथ गोगुले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.