आ.आजबेंच्या उपस्थितीत सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न
आष्टी प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडी च्या बाजूने मतदारसंघातील जनतेने कौल दिला असून जवळपास 60 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत आता एवढ्यावरच न थांबता आपले पुढील लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या आहेत त्यामध्येही कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत मध्ये मिळालेले यशाचे सर्व श्रेय हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आष्टी येथील साई दत्त मंगल कार्यालयात रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आ. बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख ज्येष्ठ नेते सहकार महर्षी रामकृष्ण बांगर परमेश्वर काका शेळके माजी जि प अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे बलभीमराव सुंबरे ,तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी विश्वास नागरगोजे शिवभूषण जाधव किशोर हंबर्डे काकासाहेब शिंदे,सुनिल नाथ, भाऊसाहेब लटपटे डॉक्टर मधुकर हंबर्डे संदीपभाऊ सुंबरे शिवाजी नाकाडे मीनाक्षीताई पांडुळे रविकाका ढोबळे युवा नेते महेश आजबे, संग्राम आजबे,परशुराम मराठे,हरिभाऊ दहातोंडे, जगन्नाथ ढोबळेयांची प्रमुख उपस्थिती होती, नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मतदारसंघातून 65 ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते , यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की मतदारसंघातील जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे त्यामुळे यापुढे आता आपली जबाबदारी वाढली असून गावातील समस्या व विकास कामे प्राधान्याने सोडवण्यावर आपण भर दिला पाहिजे ज्या ठिकाणी अडचणी येथील त्या ठिकाणी मी आमदार म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आता निवडणुका संपल्या आहेत कोणीही आपले विरोधक नाही त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीचे काम आपल्याकडून झाले पाहिजे विरोध हा निवडणुकीपुरता ठेवून इतर वेळी आपण सर्वाना बरोबर घेऊन काम केले पाहिजे, आपण प्रथम नागरिक या नात्याने सर्वांची कामे प्राधान्याने केली पाहिजेत गावातील ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी अंगणवाडी इमारत, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा योजना, पशुसंवर्धनाची काळजी गरजूंना घरकुले एमआरईजीएस सारखी योजना प्रभावीपणे राबवणे यासारख्या लोक उपयोगी योजनांना प्रथम प्राधान्य देऊन ही कामे मार्गे लावावीत ती मंजूर करून घेण्यासाठी मी आपल्या पाठीशी उभा आहे मतदार संघातील जनतेने मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत या आपल्या ताब्यात दिल्या आहेत आता कार्यकर्त्यांनी येथेच न थांबता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही अशाच प्रकारे भरघोष यश मिळवून या स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात कशा येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी लवकरच आपण एक तालुका निहाय बैठक बोलवणार असल्याचेही आमदार आजबे यांनी यावेळी बोलताना सांगितले,तर यावेळी बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की गावामध्ये फक्त नावापुरते सरपंच न राहता येणाऱ्या पिढीने आपला आदर्श घ्यावा असे काम निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी करून दाखवावे सरपंचांनी सर्व कामकाजाची माहिती करून घ्यावी सरपंचाला अनेक अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर सरपंचांनी केला पाहिजे ग्रामपंचायत प्रमाणे लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून यश मिळणार आहे हे आजच्या या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सरपंचाच्या संख्येवरून दिसून येत असल्याचे माजी आमदार दरेकर नाना यावेळी बोलताना म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत सतीश आबा शिंदे अण्णासाहेब चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .