बीड / प्रतिनिधी
मंजूर असलेल्या घरकूलाला जागा उपलब्ध करुनद्यावी या प्रमुख मागणीसाठी पारधी समाजातील अप्पाराव पवार गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या दारात खेटे घालत होते. प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने पवार कुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. यातील कुटूंब प्रमुख अप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळी रात्री मृत्यु झाला. ही बाब अतिशय गंभीर असून माणूसकीचे लक्तरं वेशीला टांगणारी आहे. या घटनेतील जबाबदार असणाऱ्या अधिकरी कर्मचारी यांच्यावर सदोष मन्युष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा अप्पाराव पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाइं तीव्र आंदोलन करेल. असा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.
पारधी समाजाचे अप्पाराव पवार हे गेल्या अनेक वर्षापासून वासनवाडी शिवार सर्व्हे नं. 166/अ याठिकाणी राहत आहे. त्यांना काही महिन्यापूर्वी घरकूल मंजूर झाले होते. या घरकूलाचा पहिला हप्ता त्यांना अदा करण्यात आलेला आहे. मात्र दुसर्या हप्त्याला जागा नसल्यामुळे आडकाठी आली. जागा उपलब्ध करुन दयावी अशी मागणी अप्पाराव पवार यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी कुटूंबासमवेत कित्येक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलेले आहे. असे असतांना त्यांना घरकूल दिले जात नसेल तर हा प्रशासनाचा अतिशय खालच्या पातळीचा नाकर्तेपणा आहे. ही बाब कदापिही सहन केली जाणार नाही. या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे.