प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील एका बड्या नेत्यावर लवकरच गुन्हा नोंद होणार असून उच्च न्यायालयाने संबंधित विभागाला याची सखोल चौकशी करुन गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू यात काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी कोर्टाला या बाबी सांगणार आहेत, यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंद होणार हे मात्र निश्चित.
जिल्ह्यातील मंत्री राहीलेल्या एका बड्या नेत्याची मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती असल्याची तक्रार उच्च न्यायालयात करण्यात आलेली होती. याच अनुषंगाने उच्च न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेले आहेत. परंतू यात काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे न्यायालयात संबंधित विभागाचे अधिकारी या तांत्रिक बाबी स्पष्ट करणार आहेत. सध्या दिपावलीमुळे कोर्ट रजेवर असल्यामुळे बुधवारी (ता. 9) या प्रकरणात कोर्ट परत काय आदेश देतो हे नऊ तारखेलाच समजेल. परंतू कोर्टाने दिलेल्या आदेश तात्काळ गुन्हे नोंद करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत. सध्या संबंधित विभागातील अधिकारी यात काय निर्णय घ्यावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेत आहेत.