वरवटी येथील युवा कार्यकर्त्यांचा खांडेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
बीड प्रतिनिधी : शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वसामान्यांसाठी न्याय देणारे सरकार आले आहे. त्यामुळे शासकिय योजनांचा जास्तीत जास्त लाभ आपल्या भागातील लाभार्थींना मिळवून देण्यासाठी आणि पक्षाचे विचार तळागाळात रुजवण्यासाठी ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी अधिक जोमाने कामा लागावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. बीड येथील शिवसेना संपर्क कार्यालयात वरवटी येथील युवा कार्यकर्त्यांनी कुंडलिक खांडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख खांडे यांनी वरवटी येथील शिवसेना शाखेच्या कार्यकारीणी जाहिर केली. शाखा प्रमुखपदी राजेश शिंदे यांची निवड करण्यात आली.
या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ जाधव,तालूकाप्रमुख संतोष घुमरे, तालूकाप्रमुख राहुल चौरे, युवा नेते गणेश उगले, शहरप्रमुख कल्याण कवचट,सरपंच लहू खांडे, उपतालूकाप्रमुख देवराव आबा घोडके, उपविभाग प्रमुख रंजीत कदम, रमेश शिंदे, जेष्ठ शिवसैनिक काकसाहेब जाधव, परमेश्वर डाके, चंद्रसेन शेंडगे, रामप्रभु घोडके, प्रदीप शिंदे, चेअरमन मधुकर डोईफोडे, राहुल साळुंके, कांता डोईफोडे, नामदेव खांडे, गणेश डोईफोडे, नारायण साळुंके, बाबुराव खांडे, मंगेश वनवे आदिंची उपस्थितीत होती.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख खांडे यांनी वरवटी शिवसेनेच्या शाखेच्या प्रमुखपदी राजेंद्र शिंदे तर उपाध्यक्षपदी शहादेव कोटुळे, सचिव पदी नंदु साळुंके यांची तर सदस्य म्हणून सुगंध फाटक, शिवलाल आहेर, महादेव लांडगे, मोहन गवते, सचिन शिंदे, विलास कोटुळे, श्रीकांत कोटुळे, गणेश साळुंके, खंडू कोटुळे, नंदु कोटुळे, सुमित मातकर, महेश मातकर, खोटे, नागेश कोटुळे, सचिन कोटुळे, बलराज कोटुळे, गोविंद शिंदे यांची निवड केली.