ग्रामीण भागातील नागरीकांची होतेय गैरसोय; पोलीस अधिक्षकांनी लक्ष द्या!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : तालुक्यातील ग्रामिण भागात गेल्या काही महिन्यांपासून अवैद्य धंद्यांचा सुळसुळात सुरु आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासर्व प्रकाराकडे बीड ग्रामिण पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे सध्या ग्रामिण हद्दीत अवैद्य धंदे तेजीत सुरु आहेत. यासर्व बाबींकडे पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष देऊन बीड ग्रामिण हद्दीत सुरु असलेला गैरप्रकार थांबवावा अशी मागणी होत आहे.
बीड तालुक्यातील ग्रामिण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैद्य धंदे तेजीत सुरु आहेत. यात बनावट दारुची विक्री, गुटखा विक्री, मटका, अवैद्य वाळू उपसा यासह इतर अवैद्य धंदे सुरु आहेत. या सर्व प्रकाराकडे ग्रामिण पोलीस दुर्लक्ष करत आहेत. यामुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांची मानमानी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यात काही गावे अशी आहेत की, त्याठिकाणी तर वरील सर्व धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामुळे याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता होत आहे.