28 जुलैला जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत
बीड – कोर्टाने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्यानंतर निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रम परत हाती घेतला आहे. आयोगाने आरक्षणाच्या सोडतीसाठी २८ जुलैची तारीख दिली आहे. जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीसाठी २६ जुलै रोजी अधिसूचना काढतील, त्यानंतर २८ जुलै रोजी प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हापरिषदेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तर पंचायत समित्यांसाठी तहसीलदारांच्या पातळीवर आरक्षण सोडत होईल. त्यानंतर आक्षेप आणि सुनावण्या पूर्ण करून जिल्हाधिकारी ५ ऑगस्टला अंतिम आरक्षण जाहीर करणार आहेत. यामुळे आता भावी सदस्य कामाला लागणार आहेत.