श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात
—————————-
गेवराई: जिवनात गुरुला अन्यसाधारण महत्त्व असुन प्रत्येकाने जिवनात गुरु केला पाहिजे. गुरु शिवाय जिवन व्यर्थ आहे.गुरुशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरुंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर होय असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत ह.भ.प.दत्ता महाराज गिरी यांनी आयोजित गुरुपौर्णिमा सोहळ्यात प्रवचन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव येथे महान तपस्वी तपोनिधी वै.ब्रम्हनिष्ठ गुरुवर्य महंत ह.भ.प.बुधगिरीजी महाराज यांच्या १०८ व्या पुण्यतिथी व गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार दि.१३ रोजी गुरूपुजन सोहळा तसेच प्रवचण, भजन यासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, शिवाजी महाराज गिरी, सामाजिक कार्यकर्ते दामोधर भोसले, कैलासबाबा गिरी, पत्रकार विनोद पौळ, श्रीधर पौळ, महादेव महाराज बिचकुले, यांच्या सह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना दत्ता महाराज यांनी सांगितले की सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे तरी प्रत्येकाने आपल्या परिसरात एक तरी झाड लावुन त्यांचे संवर्धन केले पाहिजे. यामुळे निसर्गाचा समतोल राहील. तसेच आपल्या आई वडिलांची निस्वार्थपणे सेवा करुन त्यांची काळजी घ्या.असा मौलिक सल्ला ही यावेळी शेवटी बोलताना त्यांनी दिला.तर गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थानचे महंत ह.भ.प महंत दत्ता महाराज गिरी यांचे गुरुपुजन झाले. या नंतर दामोधर भोसले, उमेश भोसले, कैलास भोसले, महादेव बिचकुले,नाथा कोकरे,वैजीनाथ रोमन या भक्त मंडळीच्या वतिने महाप्रसाद देण्यात आला तर गुरूपौर्णिमा उत्सव कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील महिला व पुरूष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.