बीड प्रतिनीधी
देशाचे लाकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोद्या राम मंदीरा नंतर करोडो हिंदु धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.काशीविश्वनाथ धाम नगरीचा कायापालट करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनतर आज नव्याने काशीनगरीला अलौकीक गौरव प्राप्त करुन दिला. पुरातन आणि प्रचीन काशीनगरीला इतिहास आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेची ओळख काशी नगरी आहे. या नगरीचा परिपुर्ण जीर्णोद्धार व्हावा ही भारत वासीयांची बऱ्याच काळापासुन इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वकांक्षी योजना अखुन अत्यंत कमी कालवधीत या धामचे सौंदर्यीकरण व भावीक भक्तांच्या करीता सर्व सोयी सुवीधा सह विराट मंदिर परिसर निर्मितीचे ऐतिहासीक काम केले आहे. ईश्वरावरती प्रचंड श्रद्धा आणि मानवी संवेदना जपनाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी नगरीमध्ये अदभुत कार्यकरुन जनतेच्या अकांक्षा पुर्ण केल्या आहेत.
श्री.काशीविश्वनाथ धाम परियोजनेमुळे भारतीय संस्कृतीच्या परंपरेत नव्याने वैभवाचा तुरा रोवला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्ती प्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकृती मुळे वंदनीय ठरत आहेत. असे गौरव उद्गार परंम आदरणीय धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराज यांनी दिव्यकाशी -भव्यकाशी सोहळा थेट प्रक्षेपन दरम्याण व्यक्त केले.
आज वारणसी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशीधाम लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या मा.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व साधु संतांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम बीड शहरातील श्री.सोमेश्वर मंदीर येथे आयोजीत करण्यात आला होता. साधु संतांच्या हस्ते श्री.सोमेश्वरांची महाआरती करण्यात आली.
प.पु.श्री.धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराज, रामगडाचे महंत योगीराज महाराज, विद्या महाराज खडकीकर, मस्तगिरी महाराज, संजय गुरव महाराज कंकालेश्वर मंदीर, ह.भ.प.मुंडे महाराज ताडसोणेकर, ह.भ.प.विष्णु महाराज सुरवसे, यांच्या सह आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. तसेच भाजपा पदाधिकारी सर्वश्री. माजी.आ.आदीनाथराव नवले, नवनाथ शिराळे, ॲड.सर्जेराव तात्या तांदळे, राजेंद्र बांगर, प्रा.देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, विक्रांत हजारी, भगीरथ बियाणी, डॉ लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, प्रमोद रामदासी, हरीष खाडे, अमोल वडतीले, मनोज ठाणगे, मीरा गांधले, शैलजा मुसळे, छाया मिसाळ, शितल राजपुत, गंगुबाई , अलका डावकर, संभाजी सुर्वे, महेश सावंत, कल्याण पवार, पंकज धांडे, दुष्यंत डोंगरे, सुरेश माने, बाबूराव परळकर, विलास बामणे, दत्ता परळकर, नागोराव काकडे, फिरंगे महाराज, काशीद, बापूराव पिंगळे पांडुरंग जानोळे, डिगांबर दोडके, नागुराव काकडे, दत्ताभाऊ थिगळे, चंद्रकांत मुळे, सदाशिव शेजाळे, आत्माराम शिराळे, श्रीहरी वाघमारे, मुरली दुधाळ, हनुमंत गायकवाड, प्रवीण देवा मुळे, आत्माराम काशदी, कुलकर्णी, प्रा.महादेव आंधळे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी शक्ती प्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.