बीड प्रतिनिधी
गेली बारा दिवसापासुन चालु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपात. बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रवाशांचे राज्यात प्रचंड हाल व लुटमार चालु असताना राज्य सरकारने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. सरकारच्या दुर्लक्षपणामुळे एसटी कर्मचारी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्तेचा मार्ग स्विकारत आहेत. आत्महत्या होत असतानाही अध्याप राज्य सरकारला घाम फुटला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या न्याय हक्कासाठी जरुर लोकशाही मार्गाने संघर्ष करुन संवेदनशून्य सरकारला जागे करावे परंतु कोणीही आत्महत्येचा मार्ग स्विकारु नये असे कळकळीचे अवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचारी गेली चार दिवसापासून संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्याच्या संपाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने काल बीड आगारातील एसटी कर्मचारी अमोल कोकटवाड वय 35 वर्षे चालक या कर्मचाऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालयात आय.सी.यु विभागामध्ये उपचार चालू आहेत. आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन अमोल कोकटवाड यांना भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर बीड आगारात जाऊन संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद सादुन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत भगीरथ बियाणी,संजय सानप,गणेश तोडेकर, आशोक पांढरे, ऋषी फुंदे, अम्मु भाई आदी उपस्थित होते.
एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करावे या मागणीसाठी राज्यात गेल्या आठवड्यापासुन एसटी कर्मचाऱ्याचा संप चालु आहे. या संपात बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचारी बहुसंख्येने सामील असुन बस सेवा ठप्प झाली आहे.
एसटी सेवा ही राज्याची जीवनवाहिनी आहे. ग्रामीण जनतेसाठी एसटी सेवा महत्वाचे माध्यम आहे. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून. खाजगी बससेवा धारक प्रवाशांची लुट करीत आहेत. कोरोना लॉकडाऊन नंतर जनजीवन सुरळीत होत असाताना सामान्य जनतेला एसटी कर्मचारी संपाचा त्रास सहन करावा लागत आहे.
एसटी कर्मचारी उत्सफुर्तपणे संपात उतरला आहे. जवळपास 34 एसटी कर्मचाज्यांनी आपली जीवन यात्रा नैराष्यपोटी संपवली आहे. अशा गंभीर परिस्थितीत ही राज्य सरकार या संपाकडे गांभीर्याने पाहात नाही. या मुळे संपाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. शासनाच्या दुर्लक्ष पणा मुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यात चिड आणि वौफल्य निर्माण झाले आहे.
काल बीड येथे एका संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत गंभीर व क्लेश दायी आहे. या घटने मुळे एसटी कर्मचाऱ्याच्या कुटूंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या अनूकुल निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत.
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्याना गृहीत न धरता त्यांच्या रास्त व न्याय हक्काच्या मागणीचा विचार केला पाहिजे. एसटी महामंडळ तोट्यात जाणे याची जवाबदारी एसटी कर्मचाऱ्यावर न टाकता त्यांच्या कष्टाचे घामाचे मोल त्यांना मिळाले पाहिजे. एसटी कर्मचारी सदैव जनसेवेत राबत असतो. कोरोना काळात ग्रामीण भागातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई पुणे सारख्या कोरोना बाधीत शहरात बळजबरीने सेवा करावी लागली. या कोरोना आपत्तीत शेकडो कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या वेळीही राज्य सरकारच्या नाकर्ते पणामुळे एसटी कर्मचाऱ्याना आर्थिक कुचंबना सहन करावी लागली. एसटी महामंडळ तोट्याच्या खाईत गेले असल्याने कर्मचाऱ्याच्या भवितव्य सुरक्षीत राहू शकत नाही. हे वास्तव कर्मचाज्यांच्या ध्यानी आल्यामुळेच कर्मचारी स्वत:च्या भवितव्यासाठी संपावर उतरलेला आहे.
अशा गंभीर परिस्थितीत राज्य शासनाने थेट एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला पाहिजे त्यांना त्यांच्या जीवन भवितव्याची सुरक्षीतता दिली पाहिजे. यासाठी राज्य शासनाने संवेदना जागृत ठेवून एसटी कर्मचाऱ्याच्या संपाकडे डोळस नजरेने पहावे. व त्यांची न्याय हक्कची मगणी पुर्ण करण्यासाठी ठोस पाऊल उचलावेत. अन्यथा प्रवाशीजनता आणि एसटी कर्मचाऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल. याची दखल राज्य शासनान तातडीने घ्यावी. असे सरकारला अवाहन केले आहे.