जय जयकार माता शेरावाली का; साचे दरबार की जय
——-
बीड प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे भक्तांच्या भक्तीला पावणारे जम्मू (कटरा) येथील हुबेहूब वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती बनवलेले बीडचे वैष्णोदेवी मंदिर म्हणजे बीड शहरासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पेठ बीड भागातील विप्रनगर मध्ये स्थित असणारे माता वैष्णो देवी मंदिर देवस्थान ट्रस्ट विप्रमनगर, ब्राह्मणवाडी बीड हे नवरात्रोत्सवाच्य निमीत्ताने उद्यापासून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करून दर्शनासाठी खुले होणार आहे. उद्याच्या घटस्थापनेची पूजा ह.भ.प. महादेव महाराज (चाकरवाडीकर) यांच्या शुभहस्ते आणि नगरसेवक श्री अमर नाना नायकवाडे, कोरोना योद्धा डॉ.नरेशजी कासट, श्री प्रवीणजी बियाणी, माता वैष्णो देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष संतोष सोहनी, संतोष झंवर, मोहित कासट, दर्शनजी खिंवसरा आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवस मातेचे मंदिर भक्तांसाठी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून दर्शनासाठी उघडे राहणार आहे. भक्तांनी सुद्धा नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती मंदिर संस्थांतर्फे करण्यात आली आहे. संपूर्ण नवरात्रीची तयारी आकर्षक रोषणाई मंदिर व परिसरात करण्यात आली आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री संतोष सोहनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि परीसरातील सन्माननीय भाविकांच्या सोयीसाठी परिश्रम घेत आहेत. तसेच मंदिरामध्ये अष्टमीला नवचंडी याग होमहवन नवदुर्गा पूजनचे आयोजन करण्यात आले आहे.
गत 14 वर्षापासुन बीडमध्ये माता वैष्णो देवी मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंदिरात माता वैष्णोदेवीसह महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीसह नवदुर्गाच्या मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. नवरात्रोत्सवात दरवर्षी या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाविक भक्तांसाठी माता वैष्णोदेवी मंदिर खुले राहील. नवरात्रोत्सवात दररोज सकाळी व सायंकाळी देवीची महाआरती होईल. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान मंदिर संस्थांतर्फे करण्यात आले.