मोठ्या चादरीवरुन पाणी वाहू लागले; बीड शहरकरांनी सतर्क राहण्याची गरज!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरापासून जवळचे असणारे बिंदुसरा धरण भरले असून आज चारच्या दरम्यान येथील मोठ्या चादरीवरुन पाणी वाहू लागले आहे. असाच पाऊस सुरु राहीला तर बिंदुसरेला पुर येण्याची शक्यता नाकरता येत नाही. यामुळे बिंदुसरा परिसरातील नागरीकांनी घबरदारी घेण्याची गरज आहे.
बीड तालुक्यातील बिंदुसरा धरणे हे बीड शहरासाठी अत्यंत महत्वाचे धरण आहे. हेच धरण 100% भरले असून आज येथील मोठ्या चादरीवरुन पाणी वाहू लागले आहे. ही बाब चांगली असली तरी बिंदुसरा प्रकल्प परिसरात जर मोठा पाऊस झाला तर बिंदुसरेला महापुर येऊ शकतो. यामुळे बिंदुसरा परिसरातील नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे.