बीड / प्रतिनिधी | केंद्र शासनाने लागू केलेल्या एचयुआयडी या किचकट कायद्याला विरोध करण्यासाठी बीड तालुका सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने दि २३ ऑगष्ट रोजी सर्व दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकारी, बीड यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सराफ व सुवर्णकार यांच्यासाठी एचयुआयडी हा कायदा लागू केला असून ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे, या कायद्याने सराफ व सुवर्णकारांना दिवसभर दुकानातील कामाव्यतिरिक्त कारकुनी कामाचा ताण वाढणार आहे, याशिवाय या अंतर्गत सोने मिळण्यासाठी उशीर लागणार आहे, त्याचा फटका ग्रामीण भागातील छोट्या व्यवसाईकांना बसणार आहे, अगोदरच दिवसभर मालाचे संरक्षण करणे अत्यंत जोखमीचे झालेले असताना, व कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आलेला असताना या नव्या कायद्याने सर्व व्यावसायिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, या पूर्वी लागू केलेल्या हॉलमार्क कायद्याला सराफ सुवर्णकार असोसिएशनचा पाठिंबा आहे, ग्राहकाला शुद्ध सोने मिळावे ही आमचीही भावना आहे. केंद्र सरकारच्या या जाचक कायद्याला मात्र विरोध करण्यात आहे, ग्राहकाला शुद्ध सोने मिळाव ही आमचीही भावना आहे. केंद्र सरकारच्या या जाचक कायद्याला मात्र विरोध करण्यात येत असून यासाठी आज बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यवसायिकांनी बंद पाळत निषेध व्यक्त केला. याबाबत जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सराफ सुवर्णकार बीड जिल्हाध्यक्ष गणेश बेदरे व महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फॅड्रेशनचे सहसचिव तथा बीड सराफ सुवर्णकार असोसिएशन अध्यक्ष मंगेश लोळगे, विजुसेट कुलथे, सुरेशनाना मेखे, भास्कर बागडे, देवासेट मानूरकर, लल्लुसेट मरलेचा, जनार्धन दहिवाळ, ॲड. संदीप बेदरे, फेडरेशन सल्लागार रावसाहेब टाक, गणेश बागडे, अनिल चिद्रवार, मराठवाडा उपाध्यक्ष सुधाकरराव दहिवाळ, कैलास मैड, सचिन बेदरे ढेकनमोहकर, राहुल टाक, उल्हास रुद्रावार, वैभव शहाणे, नारायण सातपुते, राहुल टाक, महेंद्र फुटाणे, लखन बेदरे, शेख बाबु, रामराजे रांजवण, रामेश्वर शहाणे, दिपक जोजारे, हिम्मत बेदरे, निलेश करमाळकर, संदिप खेडकर, पुष्करज बेदरे, सतिष बेदरे, उदय बागडे, सुहास बेदरे, गणेशसेट नांदेवालीकर, पप्पु बेदरे श्रीहरी मैड, संतोष दहिवाळ, राजु जोजारे, राजु शहाणे आदीं सराफ सुवर्णकार बांधव उपस्थित होते.
ना. रावसाहेब दानवे यांना दिले निवेदन
केद्रीय रेल्वे व खनिज कोळसा म॑त्री ना. रावसाहेब दानवे यांना एचयुआयडी कायद्याच्या विरोधात मराठवाडा अध्यक्ष गणेश बेद्रे व म॑गेश लोळगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी माहाराष्ट राज्य सल्लागार गणेश बागडे, बीड सराफ सुवर्णकार असोसिएशनचे स॑घटक सतिषसेठ बेद्रे पाटोदा सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष गोपाळ बेद्रे आदि सराफ सुवर्णकार बा॑धव सहभागी होते. यावेळी सदरील मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे प्रतिपादन ना. रावसाहेब दानवे यांनी केले.