बीड प्रतिनिधी : बीड शहरातील जनतेच्या जीवावर विरोधकांनी ३५ वर्ष नगर परिषदेची सत्ता भोगली पण या भागाचा विकास केला नाही. जनतेला मुलभुत सुविधा देऊ शकले नाही उलट ऐनवेळी पक्षाला व सामान्य कार्यकर्त्यांना धोका देवून ईतर पक्षात पळुन गेले. कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचा विश्वासघात करणा-यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे आहे असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शिवसेना, शिवसंग्राम- स.पा. व मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीड शहरातील विविध भागात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. दरम्यान बार्शीनाका येथे झालेल्या सभेला विराट गर्दी झाल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बीड नगरपरिषद सार्वत्रीक निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शिवसेना-शिवसंग्राम-स.पा.
यावेळी माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर, दिलीपराव गोरे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, बळीराम गवते, छत्रपती संभाजीनगर येथील काझी साहाब, स्वप्नील गलधर, झुंझार धांडे, खमरूद बागवान, पांडूरंग आवारे पाटील, शेख मुजीबभाई, फारुख पटेल, शेख निजाम भाई, डॉ.कादरी फक्करूद्दीन,भागवत तावरे,अनिल घुमरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.विजयसिंह पंडित म्हणाले की, शिवछत्र परिवार सदैव तुमच्या सोबत आहे या भागातील रस्ते, पुल, नाल्या,घरकुलाचे प्रलंबीत प्रश्न व पिण्याचे पाणी नियमित देऊ. ना.अजितदादा पालकमंत्री व अर्थमंत्री आहेत. विकास कामांसाठी ते बीड ला निधी कमी पडून देणार नाहीत. मतविभागणीचा फायदा भाजपाला होऊ नये म्हणुन सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील तिनही बटन दाबुन नगर परिषदेत परिवर्तन घडवून आणा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी भागवत तावरे यांनी क्षीरसागर कंपनीचा खरपूच समाचार घेतला क्षीरसागरांनी मोमीनपुरा भागाला आपली जहागीरी समजून फक्त मतासाठी वापर केला असा घणाघात त्यांनी केला. याप्रसंगी शेख मुजिब, हमरून इरफान यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान बार्शीनाका व मोमीनपूरा येथील सभेला विराट गर्दी झाल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
![]()
















