परळी (प्रतिनिधी)- मागील लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत बुथ ताब्यात घेण्यात आले होते.तोच प्रकार परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा घडण्याची शक्यता असल्याने त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सध्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना ठेवू नये. तसेच, निवडणुकीत अनुसूचित प्रकार घडू नये, पुन्हा तेच अधिकारी लाकटर, कांबळे, सालगडी म्हणून काम करीत आहेत . त्यांच्या जागी इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.मतदारांना भयमुक्त मतदान करता यावे आणि लोकशाही मार्गाने नगराध्यक्ष निवडला जावा.केवळ दादागिरी करून बुथ ताब्यात घेणार्यांचा बंदोबस्त करावा. तसेच, पोलिस यंत्रणा सुध्दा त्याच्या हाताखालचे बाहुले झाली आहे.त्यामुळे पोलिस यंत्रणा बाहेरच्या राज्यातून बोलवावी , प्रत्येक बुथवर सीसीटीव्ही बसवावेत. निवडणुकीतील हा अनुचित प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी लक्ष घालावे अशी मागणी परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष पदाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवार सौ.संध्या दिपक देशमुख व दिपक रंगनाथ देशमुख यांनी सदरील निवेदनात केली आहे.
















